दोडामार्ग वीज वितरणला शिवसेना-भाजपाचा घेराव

144
2
Google search engine
Google search engine
Google search engine

 

दोडामार्ग, ता.०४: तालुक्यातील विजकार्यालयात चाललेल्या अधिकाऱ्याच्या मनमानी कारभाराला जाब विचारण्यासाठी सेना भाजप कार्यकर्त्यानीं व मांगेली ग्रामस्थांसह आज दूपारी दोडामार्ग वीज कार्यालयावर धडक देत घेराव घातला. आलेल्या वाढीव बिलाबाबत जाब विचारत अधिकाऱ्याना धारेवर धरले.
यावेळी सेना प्रमुख बाबूराव धुरी, भाजपाचे रंगनाथ गवस, गोपाळ गवस, विजय गवस, अधिकारी चेतन पवार, जीवन चराठे, राजन निपानकर व मांगेली ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या.
गेल्या दोन महिन्यापासून विजबिले वाढीव येत असल्यामुळे येथील ग्रामस्थ हैराण झाले आहेत. यावेळी तर तळेवाडीच्या लतिका लक्ष्मण पारधी यांना घरात राहात नसतानाही तब्बल १२ हजार पेक्षाही जास्त रकमेचे बिल आले. तर सौ. पारधी यांना विज बिल कमी करण्यास टाळाटाळ केली केली जात होती. आपले विजमिटर फॉल्टी असल्यामुळे विजबिल सरासरीनुसार वाढीव काढली जातात असे अधिकाऱ्यांकडून उत्तर दिले जाते. याबाबत जाब विचारण्यासाठी मंगळवारी दूपारी सेना भाजप कार्यकर्ते व मांगेली ग्रामस्थांनी दोडामार्ग विज कार्यालयावर धडक देत उपस्थित अधिकारी चेतन पवार, जीवन चराठे यांना घेराव घालत धारेवर धरत प्रश्नाची सरबत्ती केली. उपकार्यकारी अभियंता कार्यालयात उपस्थित नसल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात आली.
यावेळी शिवसेना उपसंघटक श्री. गोपाळ गवस व मांगेली सरपंच श्री. विजय गवस आक्रमक पवित्रा घेत वीज मीटर बदलायचा अर्ज देऊनही विजमिटर बदलला नाही याचा भुर्दंड तुम्ही भरा असे संगत श्री. गवस यांनी वीजबिल फाडून विजवीतरणचा निषेध केला. त्यानंतर मांगेलीत सध्यस्थितीत तीस ते चाळीस टक्के विजमिटर फॉल्टी आहेत ते कधी बदलणार? असा प्रश्न उपस्थित केला. यावर ठोस निर्णय झाला पाहिजे आणि बिलात असलेले त्रुटी त्या गावात जाऊन दुरुस्त करा आणि जनतेचा समस्या सोडवा. त्यानंतर उपस्थित अधिकारी यानी येत्या शुक्रवारी मांगेली गावात जाऊन समस्या सोडऊ असे सांगितल्यावर घेराव मागे घेण्यात आला.

\