तेली व दानवेंची मुंबईत गुप्त भेट…

2

राजन तेली म्हणतात ‘आगे आगे देखो होता है क्या’

सावंतवाडी, ता. 04 : येथील विधानसभा मतदार संघ भाजपा स्वबळावर लढविण्याची भाषा करीत असताना माजी आमदार व भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. यावेळी त्यांची तब्बल दीड तास चर्चा झाली. आपण फक्त त्यांचे स्वागत करण्यासाठी गेलो होतो आगे आगे देखो होता है क्या असे राजन तेली यांनी सांगून झालेल्या चर्चेबाबत बोलण्यास नकार दिला आहे.
दरम्यान कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार विधानसभेच्या बांधणीबाबत त्यांची गुप्त बैठक झाल्याची चर्चा आहे. श्री. तेली यांनी भाजपचे नवनिर्वाचित खासदार दानवे यांची त्यांच्या कार्यालयात जावून भेट घेतली. यावेळी त्यांचे पुत्र प्रथमेश तेली उपस्थित होते. या दोघांकडून दानवे यांचे अभिनंदन करतानाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. तर श्री. तेली यांनी आगामी विधानसभा भाजपाकडून लढविली जावी यासाठी दानवेंशी बोलणी केल्याची चर्चा आहे. याबाबत श्री. तेली यांच्याशी संपर्क साधला असता आपण फक्त त्यांचे स्वागत करण्यासाठी गेलो होतो. आगे आगे देखो होता है क्या असे सांगून त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.

11

4