…तर मी पदाचा राजीनामा देईन : पालकमंत्री दीपक केसरकर

2

सावंतवाडी,ता.०५: मी एक जरी बीजेपीचा कार्यकर्ता फोडायचा प्रयत्न केला असेन तर मी पदाचा राजीनामा देईन.सेना भाजपचे सर्व कार्यकते माझा जवळचे आहेत.जर कोणी उगाच काही बोलत असेल तर ते चुकीचे आहे. अशी टीका राजन तेली यांचे नाव न घेता पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली.[embedyt] https://www.youtube.com/watch?v=L62YCKg70eg[/embedyt]
आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.ते म्हणाले यापूर्वी भाजपा मधून शिवसेनेत होणारे पक्ष प्रवेश मी थांबवले आहेत.भाजप शिवसेना एकच आहे त्यामुळे मला भाजपाचे कार्यकर्ते फोडण्यात कोणताही रस नाही.माझ्याकडे भाजपाचे कार्यकर्ते आपली कामे घेऊन येतात.कोणताही भेदभाव न करता मी कामे करत आहे.त्यामुळे हे बुद्धिभेद थांबविण्यासाठी याबाबत वरील नेते मंडळींच्या कानावर घालणार आहे.

12

4