अशोक दाभोलकर-मेस्त्री यांना लोकरत्न पुरस्कार 

328
2
Google search engine
Google search engine
Google search engine

 

वेंगुर्ले, ता. ५ : क्रीडा व सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली गावचे सुपुत्र, राष्ट्रीय हॉलीबॉल पंच अशोक दाभोलकर-मेस्त्री यांना ‘महाराष्ट्र-गोवा टॅलेंट लोकरत्न अॅवॉर्ड २०१९‘ या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

गोवा-वास्को येथे २ जून रोजी कला पर्यटन व सांस्कृतिक महोत्सव समिती, सिधुदुर्ग-गोवातर्फे आशियाई कला, साहित्य सांस्कृतिक व सामाजिक महासंमेलन पार पडले. या संमेलनात दाभोली येथील अशोक दाभोलकर-मेस्त्री यांच्या क्रीडा व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना ‘महाराष्ट्र-गोवा टॅलेंट लोकरत्न अॅवॉर्ड २०१९‘ हा पुरस्कार देण्यात आला. सदरचा पुरस्कार थोर समाजसेवक, पद्मश्री डॉ.प्रकाश आमटे व डॉ.सौ.मंदिकिनी आमटे यांच्या हस्ते श्री. दाभोलकर-मेस्त्री यांना सन्मानपूर्वक वितरीत करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ उद्योजक व मुंबई उपनगर जिल्हा शुटींग बॉल संघटनेचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण परब, प्रा.बी.एन.खरात यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.वैभव खानोलकर (खानोली) यांनी केले.

\