सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम तर दापोली विद्यापीठात व्दितीय
सावंतवाडी, ता.०५: तालुक्यातील कृषी तंत्रनिकेतन,पाडलोसच्या कु.रक्षा रमाकांत पटेकर हिने कृषी तंत्रज्ञान पदविका परीक्षेत सेमी-इंग्रजी माध्यमातून ८३.४९ टक्के गुण मिळवत विद्यालयासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.तर डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ,दापोलीमधून तिने व्दितीय क्रमांक पटकाविला आहे.
कोकण विभागातून ठाणे,रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग,बृहन मुंबई आणि मुंबई-उपनगर या स्तरावर ही परीक्षा घेण्यात आली होती.यात २०१८-१९ या वर्षाचा निकाल नुकताच जाहीर झाला.या परीक्षेत कु.रक्षा हिने घवघवीत यश मिळवून जिल्ह्याचे व पाडलोस कृषी विद्यापीठाचे नाव उज्वल केले आहे.या यशाबद्दल तिचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.