Thursday, June 19, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याकणकवलीत रमजान ईद सण उत्साहात साजरा

कणकवलीत रमजान ईद सण उत्साहात साजरा

आमदार नीतेश राणे यांच्याकडूनही शुभेच्छा

कणकवली, ता. 5 : कणकवली शहरासह नांदगाव, खारेपाटण तसेच इतर गावांत आज रमजान ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. यात मुस्लीम बांधवांनी मस्जिद मध्ये एकत्र येत नमाज पठण केले. तसेच एकमेकांना गळाभेट करत ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. आमदार नीतेश राणे यांनीही ट्विटरच्या माध्यमातून ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा संदेशामध्ये रमजानच्या पवित्र महिन्यात ईदचा सण आनंदाने साजरा करूया. बंधुभाव आणि सलोखा कायम ठेवूया असे नमूद करण्यात आले आहे.
मुस्लिम धर्माचा महत्त्वपूर्ण सण म्हणजे ईद उल फितर ईद उल फितर म्हणजेच रमजान ईद ही आनंद साजरा करण्याची ईद मानली जाते. आपापसांत बंधुत्वाचे संबंध प्रस्थापित करून प्रेम व आनंदाने साजरा केला जाणारा सण अशी त्याची ओळख आहे. रमजान महिन्यातील रोजे संपल्यानंतर ईद येते असल्याने रमजान ईद हा आजच्या या आनंदाचा सणादिवशी मुस्लिम बांधवांच्या चेहर्‍यावर आनंद खुललेला दिसत होता. ईदला नवीन वस्त्र परिधान करून मुस्लिम बांधव आज मशिदीत नमाज अदा करायला आले होते. अल्लाच्या प्रती नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधव एकमेकांना आलिंगन घेऊन ईदच्या शुभेच्छा देत होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments