भाजपा किसान मोर्चातर्फे ७ जून रोजी वेंगुर्लेत कार्यकर्ता प्रशिक्षण

137
2
Google search engine
Google search engine

 

वेंगुर्ले, ता. ५ : भाजपा किसान मोर्चा सिधुदुर्गच्यावतीने शुक्रवार ७ जून रोजी वेंगुर्ले येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्र येथे कार्यकर्ता प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी १० वाजता कार्यकर्ता नोंदणी, १०.३० वाजता पदाधिकारी स्वागत व उद्घाटन, ११ वाजता डॉ.बी.एन.सावंत यांचे ‘प्रादेशिक फळ संशोधन केंद्र-संशोधन‘ यावर मार्गदर्शन, १२ वाजता वरिष्ठ संशोधन सहाय्यक प्रमोद तस्ला यांचे ‘फळप्रक्रिया‘यावर मार्गदर्शन, दुपारी १ वाजता ‘काजू बोंडूपासून इथेनॉन निर्मिती संधी व समस्या‘ यावर कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय दापोलीचे प्रा.सोमनाथ सोनावणे हे मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी ३ वाजता डॉ.बी.एन.सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आंबा, काजू, नर्सरी, चार प्रयोगशाळा, अॅग्रो टुरिझम यांची सफर होणार आहे. या कार्यक्रमाचे व्यवस्थापन भारतीय जनता पार्टी वेंगुर्ले यांनी केले आहे.