स्वच्छतेची कुचंबणा टाळण्यासाठी एसबीआय कडून स्वच्छतागृह…

289
2

 

चौकेत विभागीय व्यवस्थापक मकरंद आपटे यांच्या हस्ते उदघाटन…

मालवण, ता. ५ : विद्यार्थ्यांची स्वच्छतेची कुचंबणा टाळण्यासाठी एसबीआय लाईफने स्वच्छतागृहाचा उपक्रम राबविला आहे. ज्या जनतेने कंपनीला मोठे केले. त्या लोकांच्या, समाजाच्या उपकारांची परतफेड म्हणून कंपनीला मिळालेल्या फायद्यातून काही पैसा समाजोपयोगी कामांसाठी एसबीआय खर्च करत आहे. विद्यार्थ्यांना शालेय जीवनाची, शिक्षणाची आवड निर्माण होण्यासाठी अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे काम एसबीआय करत आहे. असे प्रतिपादन स्टेट बँक ऑफ इंडिया लाइफ इन्शुअरन्सचे मुंबई विभागाचे विभागीय व्यवस्थापक मकरंद आपटे यांनी केले.
स्टेट बँक ऑफ इंडिया लाइफ इन्शुअरन्स मुंबई यांच्या माफत देण्यात आलेल्या ५ लाख रुपयांच्या शैक्षणिक देणगीतून चौके पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित भ. ता. चव्हाण. महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय चौके येथे विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या अद्ययावत स्वच्छतागृहाचे उद्घाटन श्री. आपटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चौके हायस्कूल स्थानिक समिती अध्यक्ष बिजेंद्र गावडे, अजय नाईक, पांडुरंग सावंत, मुंबई समिती उपाध्यक्ष आर. जी. चौकेकर, सदस्य शंकर गावडे, मुख्याध्यापक एन. डी. सावंत, पालक शिक्षक समिती उपाध्यक्ष मोहन गावडे, बाळा तावडे, धानजी चव्हाण, नंदू राणे, विष्णू चौकेकर, संगम चव्हाण, श्री. गावकर, श्री. परुळेकर, गावडे गुरुजी आदी उपस्थित होते.
या स्वच्छतागृहाची देखभाल, स्वच्छता विद्यार्थी, शिक्षक, व्यवस्थापन समिती सदस्यांनी करावी असे आवाहन श्री. आपटे यांनी केले. संस्थेच्यावतीने मकरंद आपटे, अजय नाईक, पांडुरंग सावंत यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. स्थानिक समिती अध्यक्ष बिजेंद्र गावडे यांनी एसबीआय लाइफ इन्शुअरन्स कंपनीचे आणि अधिकार्‍यांचे आभार मानले.

4