Sunday, December 14, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यादोडामार्ग शहरवासियांनी मायनिंगचे ट्रक रोखले

दोडामार्ग शहरवासियांनी मायनिंगचे ट्रक रोखले

दोडामार्ग, ता. ०५ : दोडामार्ग शहरातुन मोठी वाहने वाहतुक करत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या भेडसावते. याबाबत वारंवार पोलिस प्रशासनाकडे निवेदन तथा मागणी करुनही कारवाई होत नसल्याने आज दोडामार्ग शहरवासियांनी मायनिंगचे ट्रक रोखून धरले. जोपर्यंत बेकायदेशीरपणे चालु असलेल्या वाहतूकीवर ठोस कारवाई होत नाही, कायमस्वरूपी बाजारातून मोठी वाहतूक बंद होत नाही तोपर्यंत हे ट्रक सोडले जाणार नाहीत, असा आक्रमक पवित्रा यावेळी घेतला.

यावेळी दोडामार्ग नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण, भाजप शहराध्यक्ष योगेश महाले, स्वाभिमान शहराध्यक्ष दादा बोर्डेकर, कॉंग्रेस शहराध्यक्ष संदेश बोर्डेकर, समीर रेडकर, विकी कवठणकर, रंगनाथ गवस, निलेश रेडकर, विशाल चव्हाण आदींसह युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

दोडामार्ग शहरात सतत जाणवणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत ब-याच वेळा कल्पना देऊनही संबंधित विभागाकडून दखल घेतली जात नसल्याने दोडामार्ग युवकामध्ये नाराजी आहे. आज दोडामार्गमधील युवकांनी पुन्हा एकदा एकत्रित येत वाहने रोखली. त्यावेळी घटनास्थळी पोलिस प्रशासनाची अधिकारी दाखल झाले. त्यावेळी या बेकायदेशीरपणे चालु असलेल्या  मोठ्या वाहनावर कारवाई करा असे उपस्थित युवकांनीं सांगितले. परंतु पोलिसांनी हे काम आर.टि.ओ. विभागाचे आहे. कारवाई करण्याचे काम आपले नसल्याचे सांगत आपले हात वर केले. यावर कारवाई करणार तरी कोण असा प्रश्न उपस्थित युवकांमधे निर्माण झाला आहे. त्यामुळे संतप्त दोडामार्ग युवकांनीं या गाड्या रोखून ठेवत जोपर्यंत ही मोठि वाहतूक बाजारपेठेतून कायम स्वरूपी बंद होत नाही तसेच या गाड्यावर योग्य कारवाई होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा दोडामार्ग शहरवासीयांनी घेतला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments