आधुनिक काळात टीकण्यासाठी तंत्रशिक्षण गरजेचे

172
2
Google search engine
Google search engine

अनामिका जाधव : भोसले नॉलेज सिटीचा सहावा वर्धापनदिन साजरा

सावंतवाडी, ता. 06 : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात टीकण्यासाठी तंत्रशिक्षण घेणेे ही काळाची गरज आहे. जोपर्यंत आपण हे घेत नाही तोपर्यंत जीवन व्यापक बनणार नाही, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या प्रभारी कार्यकारी अभियंता अनामिका जाधव यांनी आज येथे केले.
येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमध्ये तंत्रशिक्षण संचलनालय आणि महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने भोसले नॉलेज सिटीच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या करिअर फेअर मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी सौ. जाधव बोलत होत्या.
यावेळी पॉलिटेक्निकचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले, बँक ऑफ इंडिया सावंतवाडीच्या शाखा प्रबंधक स्मिता सबनिस, प्राचार्य जी. ए. भोसले, सुर्यकांत नवले, संजू कर्पे, दत्तप्रसाद गोलतकर, डॉ. जगताप आदी उपस्थित होते. सौ. जाधव म्हणाल्या, भोसले पॉलिटेक्निकच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करण्यात येत आहे. त्यांना तंत्रशिक्षण मिळावे यासाठी संस्थेकडून वाटचाल सुरू आहे. भविष्यात या शिक्षणाच्या माध्यमातून देश-परदेशात विद्यार्थी घडतील याच दृष्टीने संस्थेने वाटचाल ठेवावी.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. भोसले यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी संस्थेची वाटचाल विषद केली. या ठिकाणी शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे. येणार्‍या स्पर्धात्मक युगात हे विद्यार्थी टीकावेत. या दृष्टीने विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम संस्थेकडून सुरू आहे. याला विद्यार्थ्यांनी परिश्रमाची जोड देणे अपेक्षित आहे, असे सांगितले.