सावंतवाडी पालिकेची जाहिरात इंग्रजीत दिल्यामुळे मनसे नाराज

163
2

एका ज्येष्ठ पत्रकाराने वेधले लक्ष : पुन्हा मराठीत जाहिरात देण्याची मागणी

सावंतवाडी, ता. 06 : येथील पालिकेत आर्किटेक्ट सल्लागार उमेदवार भरतीची जाहिरात मुंबईतील एका वृत्तपत्रात इंग्रजी भाषेतून देण्यात आली आहे. याबाबत मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार सुरेंद्र मुळीक यांनी सोशल मिडीयाव्दारे नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान ही जाहिरात मराठी भाषेत देण्यात यावी, अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा मनसेचे पदाधिकारी राजू कासकर यांनी दिला आहे. आजच्या एका मुंबईच्या वृत्तपत्रात ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. त्यात इंग्रजी भाषेचा उल्लेख आहे. मात्र याबाबत श्री. मुळीक यांनी नाराजी व्यक्त केली असून ही जाहिरात मराठी भाषेत का दिली नाही. आर्किटेक्ट लोकांना मराठी भाषा समजत नाही का, की मराठी लोकांना डावलण्यासाठी हा प्रकार सुरू आहे, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. या प्रश्नाला धरून कासकर यांनी पुन्हा मराठीत ही जाहिरात द्यावी अशी मागणी केली आहे.

4