पहिल्या पावसातच हायवे कामाची पोलखोल…

752
2
Google search engine
Google search engine
Google search engine

रस्ता खचला:एसटी व इतर वाहने रुतली…

कणकवली ता.०६: पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने चौपदरीकरण कामाची चांगलीच पोलखोल केली आहे.महामार्गालगत ठिकठिकाणी मातीचा भराव वाहून गेला आहे.तर अनेक ठिकाणी पर्यायी रस्ता खचला आहे.महामार्गालगतच्या घरांमध्येही पाणी गेले आहे.आज कणकवली शहर आणि वागदे परिसरात असलेल्या या रस्त्यामध्ये अनेक वाहने अडकली होती.


बस स्थानक परिसरात रस्ता खचल्याने एसटी महामंडळाची बस देखील अडकून पडली होती.पावसापूर्वी महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत पाणी निचरा होण्याची सर्व कामे करावीत असे निर्देश तसेच इशारे लोकप्रतिनिधींनी दिले होते.मात्र मुजोर हायवे ठेकेदाराने यातील कोणतीही कामे केली नसल्याचा फटका वाहन चालक आणि सर्वसामान्यांना बसला आहे.

\