साळगाव येथील जयहिंद कॉलेजमध्ये हॉटेल मॅनेजमेंटसाठी प्रवेश सुरू…

187
2
Google search engine
Google search engine

कुडाळ, ता. 06 : कुडाळ येथील जयहिंद कॉलेज ऑफ साळगाव या महाविद्यालयात हॉटेल मॅनेजमेंट पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती संस्थेच्यावतीने देण्यात आली. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना नोकरी शोधण्याची गरज नाही. शिक्षण सुरू असतानाच रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. सद्यस्थितीत मोठमोठ्या हॉटेल इंडस्ट्रीज, फाईव्ह स्टार, सेव्हन स्टार हॉटेल, क्रुझ आदी ठिकाणी रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्याचबरोबर कॅटरींग संस्था, रेल्वे, हवाई वाहतूक, हॉस्पीटल, ट्रॅव्हल्स अ‍ॅण्ड टुरीझम आदी क्षेत्रात हा कोर्स फायद्याचा ठरतो. संस्थेच्या माध्यमातून कुडाळ तालुक्यातील साळगाव येथे जयहिंद कॉलेज ऑफ सायन्स येथे हॉटेल मॅनेजमेंट हा महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त व मुंबई विद्यापीठाचा पदवी अभ्यासक्रम सुरू केला आहे. 45 टक्के गुण प्राप्त झालेल्या बारावीचा कोणत्याही शाखेचा विद्यार्थी या ठिकाणी प्रवेश घेऊ शकतो. उत्कृष्ट निसर्गरम्य परिसर, ग्रंथालय, संगणक कक्ष, अद्ययावत किचन, रेस्टॉरंट, फ्रंट ऑफिस, हॉस्पिटॅलिटी कक्ष तसेच वसतीगृहाची सोय आणि प्रशिक्षित प्राध्यापक वर्ग या ठिकाणी आहे.
माहिती व प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी प्राचार्य, जयहिंद कॉलेज ऑफ सायन्स, साळगाव, ता. कुडाळ, भ्रमणध्वनी क्र. (02362) 232302, 7030938095 / 96 येथे संपर्क साधण्याचे आवाहन ठाकूर यांनी केले आहे.