Wednesday, December 4, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यामांगवली येथील बंद पाडलेले जलवाहिनीचे काम सुरू

मांगवली येथील बंद पाडलेले जलवाहिनीचे काम सुरू

दोन दिवसांत अपर जिल्हाधिका-यांशी भेट घडवून देण्याचे पाटबंधारे अधिकाऱ्यांचे आश्वासन

वैभववाडी, ता. ०६ : पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी अपर जिल्हाधिकारी यांची भेट घडवून प्रश्न सोडविण्याचे आश्वासन मांगवली ग्रामस्थांना दिल्यानंतर मंगळवारी बंद पाडलेले काम बुधवारी दुपारनंतर नळयोजनेच्या जलवाहीण्यांचे काम सुरु करण्यात आले.
मंगळवारी मांगवली ग्रामस्थांनी जलवाहीनीचे काम रोखल्यामुळे पाटबंधारे विभागाने पोलिस ठाण्यात अर्ज दिला होता.यावेळी सरपंच राजेंद्र राणे, माजी सरपंच महेश संसारे, तंटामूक्त अध्यक्ष शामराव शेळके, शिवाजी नाटेकर, प्रसाद जावडेकर, हरिश्चंद्र तेली आदी.ग्रामस्थांना पोलिस ठाण्यात चर्चेला बोलवले होते. स.पो.नि.दत्ताञय बाकारे , राजन डवरी, संदीप दावणे आदी.या बैठकीला उपस्थित होते.
यावेळी मांगवली ग्रामस्थांच्यावतीने राजेंद्र राणे व महेश संसारे यांनी बाजू मांडली.यावेळी दोन दिवसात अपर जिल्हाधिकारी यांची भेट घडवून आणण्याचे आश्वासन दिले.रस्त्याच्या दुरावस्थे बाबत जिल्हाधिका- यांना अहवाल देऊन रस्ता दुरुस्तीसाठी निधीची मागणी करु.तसेच पावसाळा सुरु झाल्याशिवाय ढवळेवाडी विहीरीवरुन पाणी नियमित पाणी उपसा करणार नाही.त्यामुळे जलवाहीन्यांचे काम सुरु करु दया अशी विनंती केली.त्यानंतर काम करण्यास मागवली ग्रामस्थांनी अनुमती दिली आहे.
अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन गावठाणांतील वाहनांच्या वर्दळीने मांगवली गावातील प्रमुख रस्त्याची दुरवस्था झाली असून या रस्त्याच्या दुरुस्तीसह अन्य विषयांबाबत २०१३ मध्ये लेखी आश्वासन दिले होते. मात्र आजमितीस पाटबंधारे विभागाने त्याकडे पुर्णतः दुर्लक्ष केल्यामुळे मंगळवारी पुनर्वसनाच्या जलवाहिनीचे पोलीस बंदोबस्तातील काम मांगवली ग्रामस्थांनी रोखले होते.
जलवाहिनीचे काम रोखल्याबाबत पाटबंधारे विभागाने पोलीस ठाण्यात अर्ज दिला होता. त्यामुळे सरपंच राजेंद्र राणे, माजी सरपंच महेश संसारे, तंटामुक्त समिती अध्यक्ष शामराव शेळके, शिवाजी नाटेकर, प्रसाद जावडेकर, हरिश्चंद्र तेली आदी ग्रामस्थांना पोलिसांनी चर्चेसाठी बोलावले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाकारे यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीला राजन डवरी व उपअभियंता संदीप दावणे उपस्थित होते.
यावेळी काम अडविण्यामागील संपुर्ण पार्श्वभूमी राजेंद्र राणे व महेश संसारे यांनी सांगितली. त्यावेळी दोन दिवसात अपर जिल्हाधिकारी यांची अरुणा प्रकल्पस्थळी किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घडवून देतो. तसेच मांगवलीतील मुख्य रस्त्याच्या दुरवस्थेबाबत जिल्हाधिका-यांना अहवाल सादर दुरुस्तीसाठी निधीची मागणी करण्याची ग्वाही देत आता फक्त चाचणी घेऊ. पावसाळा सुरु झाल्याशिवाय ढवळेवाडीच्या विहीरीवरुन नियमित उपसा  करणार नाही, असे स्पष्ट करीत जलवाहिनीचे काम सुरु करु द्या, अशी विनंती डवरी यांनी  केली. त्यामुळे मांगवली ग्रामस्थांनी त्यांना काम सुरु करण्यास अनुमती दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments