वेंगुर्ले शासकीय गोडाऊनमध्ये ३२०० पोती खाण्या अयोग्य गहू…

147
2

रेशनिग दुकानदार संघटनेच्या भेटीत हा प्रकार आला उघडकीस…

वेंगुर्ले ता.०६: तालुक्याला शासनाकडून पाठविण्यात आलेला सुमारे ३२०० पोती गहू सडका असून हा खाण्यायोग्य नाही.त्यामुळे आज तालुक्यातील सर्व रेशनिंग दुकानदार चालकांनी गोडाऊनला भेट देऊन गव्हाची पाहणी केली. त्यावेळी तो खराब ससल्याचे दिसून आले.त्यामुळे हा सडका गहू तात्काळ बदलून चांगल्या प्रतीचा खाण्यायोग्य गहू द्यावा. अन्यथा तो वितरित करणार नाही असा इशारा धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने अध्यक्ष एम. के.गावडे यांनी दिला आहे.
वेंगुर्ले तालुक्यासाठी हा गहू आला आहे. मात्र तो खराब असल्याने गोडाऊन किपर यांनी तो परत पाठविला.परंतु तो तसाच वरिष्ठांनी पूंना जबरदस्तीने वेंगुर्लेत पाठवून गोडाऊन मध्ये उतरून घेण्यास भाग पाडले. सदर घटना रेशनिग दुकानदारांना कळताच आज संघटना अध्यक्ष श्री.गावडे तसेच चित्रा कनयाळकर, प्रज्ञा परब, प्रकाश गडेकर, तात्या हाडये, वासुदेव माधव, दिगंबर पेडणेकर, श्रीकृष्ण दळवी, दिनकर पालव, विक्रांत कांबळी, प्रदीप राणे, नारायण गावडे, किसन हनजनकर, गुरुनाथ मार्गी,सुहास नाईक, बाळाजी नाईक, रामचंद्र आरावनदेकर, शेखर गावडे, दयानंद धुरी, संजय मराठे, प्रवीण रेडकर यांच्यासह दुकानदारांनी वेंगुर्ले येथील शासकीय दोडाऊनला भेट देऊन त्या गव्हाची पाहणी केली.
त्या नंतर या खाण्या अयोग्य गवाची पंचयादी घालून हा गहू तालुक्यातही सर्वसामान्य गरीब कुटूबियाना वितरित करू नये. तात्काळ तो गहू माघारी घेऊन जावा व चांगल्या प्रतीचा गहू वेंगुर्लेत पाठवावा. अन्यथा आम्हला सर्व युनिट धारकांना एकत्र करून लोकशाही मार्गाने आंदोलन उभे करावे लागेल असा इशारा संघटनेने दिला आहे.

4