वायंगणी समुद्रकिनारी मच्छिमारी नौकेवर पडला विजेचा लोळ..

2

 

रापण संघाची नौका : सुमारे दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान

वेंगुर्ले, ता. ६ : तालुक्यातील वायंगणी समुद्रकिनारी आज पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास श्री देव रवळनाथ पारंपारिक मच्छिमार (रापण) यांच्या मच्छिमारी नौकेवर विजेचा लोळ पडला. त्यामुळे मच्छिमारी नौकेचे सुमारे दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र सुदयवाने कोणाला इजा झालेली नाही.
वायंगणी किनाऱ्यावर मच्छिमारी करणारा हा जुना रापण संघ आहे. जून महिना सुरू झाल्याने मासेमारी बंदी कालावधी सुरू झाला आहे. त्यातच आज पहाटे ढगांच्या गडगडटासह विजांच्या लाखलखटात पाऊस सुरू झाला. समुद्राचे पाणी वाढत होते, किनाऱ्यावर असलेल्या आपल्या मच्छिमारी नौकेत पाणी जाऊ नये या साठी ही नौका मागे ओढण्यासाठी ताता केळजी, बाळू भगत, नाना कोचरेकर, दादा मसुरकर, आबा मुनणकर, श्री. बाळा आदी प्रयत्न करीत होते. त्याच वेळी आकाशातून एक विजेचा लोळ नौकेवर कोसळला. त्यामुळे नौकेला मुख्य बाजूने मोठी उभी भेग पडून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. मात्र सुदैवाने यावेळी त्या ठिकाणी असलेल्यांनी बाजूला झाल्याने मोठा अनर्थ टळला.

4