Saturday, December 14, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यातरीही... भाजप सावंतवाडी विधानसभेत लढणारच...

तरीही… भाजप सावंतवाडी विधानसभेत लढणारच…

तालुकाध्यक्षांचा इशारा:केसरकरांनी आता मतदार संघ भाजपसाठी सोडावा

सावंतवाडी ता,०६ आगामी विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री दीपक केसरकर जरी निवडणूक रिंगणात असले तरी आम्ही भाजपच्या माध्यमातून निवडणूक स्बबळावर लढवू असा इशारा सावंतवाडी वेंगुर्ला व दोडामार्ग भाजपा तालुकाध्यक्षांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला. पालकमंत्री केसरकर दोन वेळा आमदार झाले आहेत.त्यामुळे आता त्यांनी हा मतदारसंघ भाजपसाठी सोडावा.भाजपचा आमदार निवडून येण्यासाठी प्रयत्न करावा असेही यावेळी त्यांनी सांगितले.

[embedyt] https://www.youtube.com/watch?v=e4zr2wTnjII[/embedyt]
तिन्ही तालुकाध्यक्षांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी महेश सारंग, प्रसन्ना देसाई व सुधीर दळवी बोलत होते.
यावेळी ते म्हणाले भाजपाचा कोणताही सदस्य कार्यकर्ता शिवसेनेकडे गेलेला नाही आणि जाणार सुद्धा नाही.मात्र केवळ प्रसिद्धीसाठी केसरकर आपल्यावर भाजप फोडल्याचा आरोप केला जात असल्याचा नौटंकी करत आहेत. मात्र त्याला लोक बळी पडणार नाहीत असेही त्यांनी सांगितले.

[embedyt] https://www.youtube.com/embed?listType=playlist&list=UU26AyagZUjq41hudfGa6E3A&layout=gallery[/embedyt]
केसरकरांनी नेहमी भाजपला दुय्यम स्थान दिले. त्यामुळे येणाऱ्या काळात या ठिकाणची जागा भाजपलाच द्यावी अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत. येत्या १२ तारखेला या विषयावरून बैठक आहे. त्यावेळी सकारात्मक भूमिका घेण्यात येईल असा मला विश्वास आहे असेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी महेश धुरी, दादू कविटकर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments