मळेवाड मारहाण प्रकरणी चौघांना न्यायालयीन कोठडी

2

सावंतवाडी, ता. 06 : मळेवाड येथे सावळ आणि काळोजी या दोन कुटुंबियात जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाण प्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या चौघा संशयितांना आज येथील न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. कृष्णा काळोजी, निळकंठ काळोजी, विष्णू काळोजी व अजित काळोजी अशी संशयितांची नावे आहेत. त्यांना 3 जून रोजी अटक करण्यात आली होती.
या दोन कुटुंबियात वाद असलेल्या जमिनीतून काळोजी यांची पाईप लाईन गेल्याच्या रागातून हा प्रकार घडला होता. यात दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. या प्रकरणी श्रीपाद सावळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आपले वडिल गोविंद सावळ यांच्यावर संबंधित चारही संशयितांनी कोयत्याने हल्ला केला असे म्हटले आहे. तर आपल्याला व भावालाही मारहाण झाल्याचा त्यात उल्लेख आहे. यानुसार काळोजी कुटुंबियातील चौघांना अटक करण्यात आली होती. त्यांना आज येथील न्यायालयात हजर करण्यात आले.

2

4