अद्याप तारीख जाहिर नाही : शिक्षक व पालक मात्र संभ्रमात
सावंतवाडी, ता. 06 : दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहिर होणार आहे, असे मॅसेज सोशल मिडीयावर येत असल्याने या मॅसेजवरून शिक्षक व पालक हैराण झाले. मात्र अद्यापपर्यंत अधिकृत कोणतीही तारीख जाहिर करण्यात आलेली नाही असे राज्याच्या माध्यमिक शालांत परीक्षा विभागाकडून जाहिर करण्यात आले.
गेले काही दिवस सोशल मिडीयावर आज दहावीचा निकाल आहे असा मॅसेज येत होता. त्यामुळे शिक्षकात संभ्रमाचे वातावरण होते. अनेकांनी शाळेत तसेच सायबर कॅफेत धाव घेवून खात्री करण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधितांकडून समर्पक उत्तरे मिळाली नाहीत. याबाबत राज्याच्या माध्यमिक शालांत परीक्षा विभागाच्या अधिकार्यांशी संपर्क साधला असता अद्यापपर्यंत निकालाची कोणतीही तारीख जाहीर करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले.