पाच पर्यटक सुदैवाने बचावले : काम निकृष्ट झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप
वेंगुर्ले, ता. 06 : येथील विज वितरण कंपनीच्या कार्यालयाकडून रेडी यशवंतगड समुद्रकिनार्याच्या परीसरात उभारण्यात आलेले चार सिमेंटचे खांब पहिल्याच पावसात कोसळले. आज दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडला. सुदैवाने त्या ठिकाणाहून जाणारे पाच पर्यटक बालंबाल बचावले. हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला असून याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
किनारपट्टी सुशोभिकरणासाठी आणि परिसरात रात्रीच्यावेळी पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांना सोईचे व्हावे यासाठी यशवंतगड परिसरात हे खांब उभारण्यात आले होते. त्यावर वाईरही ओढण्यात आल्या होत्या. मात्र पहिल्याच पावसात त्यातील चार खांब कोसळले आहेत. याबाबत पर्यटकांसह नागरिकात नाराजी आहे.