वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीत कोरोनाचे नियम पाळणे बंधनकारक…

0
2
Google search engine
Google search engine
Google search engine

दादासाहेब गीते; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीयांची बैठक…

 

वैभववाडी ता.३०: कोरोनाचे सर्व नियम पाळून निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. शासकीय कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी मास्कचे वापर करणे बंधनकारक आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते यांनी दिली.

वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब गीते यांच्या उपस्थितीत न.पं. सभागृहात वैभववाडी तालुक्यातील सर्व पक्षाच्या पक्षप्रमुखांची बैठक पार पाडली. यावेळी निवडणूक कार्यक्रमाबाबत गिते यांनी माहिती दिली.

बुधवार दि. १ डिसेंबर पासून अर्ज भरण्यासाठी सुरुवात होणार आहे. दि. २१ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. दि.१ ते ७ तारखेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करणे, दि. ८ डिसेंबर छाननी, १३ डिसेंबर अर्ज मागे घेणे, २१ डिसेंबर मतदान, २२ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

तसेच या निवडणूक कार्यक्रमात कोविड १९ चे सर्व नियम पाळून निवडणूक कार्यक्रम संपन्न होणार असल्याचे श्री.गिते यांनी सांगीतले. शांततेत निवडणूक पार पडण्याचे आवाहनही गीते यांनी केले. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्यधिकारी सुरज कांबळे, भाजपाचे तालुकाध्यक्ष नासीर काझी, शिवसेनेचे शहरप्रमुख प्रदीप रावराणे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दादामीया पाटणकर, मीनाताई बोडके, मनसेचे तालुकाध्यक्ष सचिन तावडे, भालचंद्र जाधव, श्री. आनंद पवार, प्राची तावडे, कर्मचारी श्री. दळवी, श्री. पवार, श्री सचिन माईणकर आदी उपस्थित होते.

\