Tuesday, December 10, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्या"त्‍या' वृद्ध महिलेच्या मृतदेहाची ओळख अद्याप अस्पष्ट...

“त्‍या’ वृद्ध महिलेच्या मृतदेहाची ओळख अद्याप अस्पष्ट…

सावंतवाडी मोती तलावातील घटना ; ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन…

सावंतवाडी ता.०७: येथील मोती तलावात आढळून आलेल्या वृद्ध महिलेच्या मृतदेहाची ओळख अद्यापर्यंत पटली नाही. ही घटना आज सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली होती. दरम्यान येथील नागरिक पप्पू राऊळ, नगरपालिका कर्मचारी मोहन कांबळे,सावंतवाडी पोलीस हवालदार रमाकांत दळवी व मयूराज कमतनूरे यांनी हा मृतदेह तलावा बाहेर काढला आहे.या मृतदेहांची ओळख पटवण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.संबंधित महिलेच्या अंगावर लाल व पिवळ्या रंगाची नक्षी असलेला गाऊन असून हा मृतदेह पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments