पुणे,ता.०७ : इयत्ता दहावीचा निकाल शनिवारी (ता. 8) दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात एसएससी बोर्डाने दिली आहे.
सोशल मीडियावरून निकालाची खोटी तारीख व्हायरल होत असल्यामुळे अफवांना उधान आले होते. अखेर, दहावीचा निकाल उद्या दुपारी लागणार आहे, असे एसएससी बोर्डाने जाहीर केले आहे.
याठिकाणी पाहता येणार निकाल
www.mahresult.nic.in
www.hscresult.mkcl.org
www.maharshtraeducation.com
कसा पाहाल निकाल?
दहावीचा निकाल पाहण्यासाठी तुम्ही तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करा. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं लिहावी लागतील.
समजा तुमचा नंबर M123456 असा आहे आणि तुमच्या आईचे नाव अश्विनी आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात M123456 हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटलमध्ये ASH असे लिहावे लागेल. दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर केला जाईल. त्यानंतर काही दिवसांनी आपापल्या शाळेतून विद्यार्थी गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र घेऊ शकतात.