दिव्यांगांना राज्य घटनेने अधिकार दिलेत,ते ताठ मानेने मिळवा…

0
2
Google search engine
Google search engine
Google search engine

डी.बी.म्हालटकर; शासकीय दिव्यांग अधिकारी-कर्मचारी संघटनेकडू मार्गदर्शन…

सिंधुदुर्गनगरी,ता.०३: दिव्यांग बांधवासोबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नेहमीच असणार आहे. विधी सेवा प्राधिकरण मार्फत दिव्यांग व्यक्तींसाठी विविध सात योजना राबविल्या जातात. राज्य घटनेने दिव्यांगाना अधिकार दिले आहेत. ते अधिकार सवलत म्हणून नाहीतर ताठ मानेने दिव्यांग व्यक्तींनी मिळविले पाहिजेत. यासाठी सर्व दिव्यांग व्यक्तींनी जागृत होणे गरजेचे आहे. न्यायालय, वकील व दिव्यांग संघटना यांनी समन्वयातून दिव्यांगासाठी चळवळ उभारूया, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव न्या डी बी म्हालटकर यांनी जागतिक दिव्यांग दिन कार्यक्रमात बोलताना केले.

जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून ओरोस फाटा येथील गोविंद सुपर मार्केट नजीक श्री इच्छापूर्ती गोविंद मंगल कार्यालय मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा दिव्यांग कर्मचारी अधिकारी संघटनेच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील शासकीय-निमशासकीय कर्मचारी-अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी शाम चव्हाण, जिल्हाध्यक्ष हरिभाऊ मिसरड, सल्लागार सुभाष पाताडे, सचिव विष्णू धावडे, सुभाष जोशी, व्ही के जाधव, विरेश दळवी, वामन परब, महेंद्र लांबोरे आदींसह मोठ्या संख्येने दिव्यांग अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

\