संबंधितांकडे पत्रव्यवहार : सरपंच मनोज उगवेकर
वेंगुर्ला, ता. ०७ : शिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयातून बदली करण्यात आलेले डॉ. पांडुरंग वजराठकर यांची बदली रद्द करण्यात यावी अशी मागणी आरोग्य विभागाकडे केली आहे अशी माहिती सरपंच मनोज उगवेकर यांनी दिली.
रुग्णांची मागणी व येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात त्याठिकाणी वजराटकर यांची गरज आहे. त्यामुळे सकारात्मक निर्णय घ्यावा असे ही त्यांनी म्हटले आहे.
शिरोडा उपजिल्हा रुग्णालय सध्या दशक्रोशीसाठी अत्यंत उपयोगी पडत आहे. छोट्या-मोठ्या आजारांवर उपचारासाठी रुग्णांना तात्काळ या ठिकाणी उपचार मिळत आहेत. डॉ. वजराटकर यांच्याकडून रुग्णांना चांगली दर्जेदार सेवा मिळत आहे. त्यामुळे त्यांची या रुग्णालयातून बदली करु नये अशी दशक्रोशितील सर्वसामान्यांची मागणी आहे. सद्यस्थितीत शिरोडा येथील सहापैकी तीन वैद्यकीय अधिकारी यांची पदे सध्या रिक्त आहेत. त्यामुळे डॉ. वजराटकर यांची बदली अन्य ठिकाणी करु नये. शिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुगणांचे हाल होऊ नये म्हणून बदली स्थगित होण्यासाठी आपण सर्व स्तरावर प्रयत्न करत असल्याचे श्री. उगवेकर यांनी सांगितले.