२०१८-१९ मध्ये जी. प. चा ७९ टक्के खर्च

166
2
Google search engine
Google search engine
Google search engine

४ कोटी ४४ लाख ६३ हजार निधी अखर्चित

सिंधुदुर्गनगरी, ता. ०७ : २०१८-१९ या आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेने स्वउत्पन्नाचा ७९ टक्के एवढा खर्च केला आहे. या वर्षासाठी जिल्हा परिषदेचे २१ कोटी ९९ लाख ४२ हजार ५०० रुपये एवढे बजेट होते. त्यातील १७ कोटी ४४ लाख ६३ हजार ४०३ रुपये एवढा निधी खर्च केला आहे. ४ कोटी ५४ लाख ७९ हजार ९७ रुपये एवढा निधी अखर्चित राहिला आहे.
हस्तांतरित योजनेसाठी ६२८ कोटी ५९ लाख १९ हजार १७१ रुपये तरतूद होती. त्यातील ५१६ कोटी ४ लाख५० हजार ८०३ रुपये एवढा निधी खर्च झाला आहे. ८२ टक्के हा खर्च झाला आहे. अभिकरण योजनेसाठी ३६ कोटी ३६ लाख ९१ हजार ५९७ रुपये तरतुद होती. त्यातील २५ कोटी ३४ लाख ७ हजार ३९१ रुपये म्हणजेच ७० टक्के खर्च झाला आहे. दुरुस्ती देखभालची ७ कोटी ३ लाख २९ हजार ७६१ रुपये एकूण तरतूद होती. त्यातील २ कोटी ८६ लाख ६९ हजार ५०९ म्हणजेच ४१ टक्के खर्च झाला आहे. खासदार निधी ८३ टक्के खर्च झाला आहे. १ कोटी ५७ लाख ३७ हजार ४२३ पैकी १ कोटी ३० लाख ६८ हजार १०२ रुपये एवढा खर्च झाला आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेसाठी २४ कोटी ९१ लाख ६७ हजार २७१ रुपये एवढी तरतूद होती. त्यातील केवळ १० कोटी ३२ लाख १५ हजार ४१६ रुपये खर्च झाले असून ४१ टक्के एवढाच निधी खर्च झाला आहे.
जिल्हा परिषदेने स्वउत्पन्ना मधील अध्यक्ष निधी ९० टक्के, सामान्य प्रशासन ८८ टक्के, शिक्षण ८१ टक्के, बांधकाम ६० टक्के, लघु पाटबंधारे ९३ टक्के, आयुर्वेद १०० टक्के, सार्वजनिक आरोग्य ९४ टक्के, सार्वजनिक आरोग्य व स्थापत्य ७८ टक्के, शेती ९९ टक्के, पशुसंवर्धन ९६ टक्के, जंगल ६४ टक्के, समाज कल्याण ९८ टक्के, महिला बाल कल्याण ९९ टक्के असा विभागवार खर्च झाला आहे.

\