हेवाळे ग्रा. प. सदस्य पदासाठीचा अश्विनी जाधव यांचा उमेदवारी अर्ज वैध

2

दोडामार्ग, ता. ०७ : हेवाळे ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी प्रभाग क्रमांक 3 मधून दाखल केलेला अश्विनी जाधव यांचा उमेदवारी अर्ज शुक्रवारी छाननित वैध्य ठरला. त्यामुळे अनुसूचित जाती जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव असलेल्या सरपंचपदी त्यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. अद्यापही उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सोमवारची दहा जून ची मुदत असल्याने त्यानंतरच सरपंच पदाबाबतचा निर्णय जाहीर होणार आहे.

गेल्या चार वर्षापासून हेवाळे ग्रामपंचायतीचे सरपंच पद रिक्त होते. अनुसूचित जाती जमाती महिला प्रवर्गासाठी सरपंच पद राखीव होते. मात्र या प्रवर्गाचा एकही सदस्य नसल्याने हे पद रिक्त राहिले. त्यामुळे प्रभारी सरपंच म्हणून संदीप देसाई काम पाहत होते. गेल्या चार वर्षात त्यांनी हेवाळे गावाला राज्याच्या नकाशावर झळकावले. हेवाळेगाव स्मार्ट ग्राम करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. या ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 3साठी पोटनिवडणूक लागली. येथून अश्विनी जाधव यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. छाननित तो वैद्य ठरला. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत सदस्य म्हणून या बिनविरोध निवडून आल्या. या ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जाती जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे सरपंच पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडण्याची दाट शक्यता आहे. अद्यापही उमेदवारी अर्ज मागे घेण्यास 10 जून ची मुदत असल्याने अद्याप त्यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले.

6

4