पियाळी येथील तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल
कणकवली, ता.7 : विवाहित महिलेला चिठ्ठी लिहून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुरूवारी (ता.6) रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी कृष्णा प्रभाकर कुडतरकर (वय 35, रा.पियाळी) या संशयिता विरोधात त्या महिलेने आज येथील पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. संशयित कृष्णा कुडतरकर हा मजूरीचे काम करतो. गुरूवारी तो विवाहिता राहत असलेल्या गावात मजूरीसाठी गेला होता. यावेळी त्याने त्या महिलेला चिठ्ठी लिहून दिली. यामध्ये माझे तुझ्यावर प्रेम आहे असा मजकूर लिहिला. तसेच तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. दरम्यान त्या संशयित आरोपी विरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.