मोर्जे खून प्रकरणी सहआरोपीना जामीन मंजूर

2

दाभोली-मोबारवाडीतील घटना : मुख्य आरोपी संदीप पाटील याची न्यायालयीन कोठडी कायम

वेंगुर्ले, ता. ७ : तालुक्यातील दाभोली मोबारवाडी येथे जमिनीच्या वादातून झालेल्या भानुदास मोर्जे खून प्रकरणातील सहआरोपी राजाराम उर्फ बंड्या कांबळी व भाई दाभोलकर यांना आज वेंगुर्ला न्यायालयात हजर केले असता प्रत्येकी १५ हजारांच्या जामिनावर त्यांची मुक्तता करण्यात आली. तर यातील मुख्य आरोपी संदीप पाटील याची न्यायालयीन कोठडी कायम ठेवण्यात आली आहे. दरम्यान तिसरा सहआरोपी शैलेश पाटील याला जामीन मंजूर झाला होता; मात्र जामीन राहणारी व्यक्ती न मिळाल्यामुळे त्यांचीही न्यायलयीन कोठडी कायम राहिली आहे. संदीप पाटील व शैलेश पाटील यांना सावंतवाडी कारागृहात ठेवण्यात आले आहे.
२८ फेब्रुवारी रोजी जमिनीच्या वादातून संदीप पाटील व भानुदास मोर्जे यांच्यात वाद होऊन त्याचे हाणामारीत रूपांतर होऊन मोर्जे यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर ४ मार्च रोजी या चारही फरार आरोपींना अटक करून प्रथम पोलिस कोठडी व नंतर न्यायलयीन कोठडी देऊन त्यांना सावंतवाडी करागृहात ठेवण्यात आले होते. दरम्यान तब्बल तीन महिन्यांनंतर यातील दोन सहआरोपी कांबळी व दाभोलकर यांची जामिनावर मुक्तता झाली आहे. आरोपींच्याया वतीने ऍड संग्राम देसाई यांनी काम पाहिले.

19

4