तारकर्लीत अजगरास जीवदान…

2

मालवण, ता. ७ : तारकर्ली येथे जाळ्यात अडकलेल्या एका दहा फूट लांबीच्या अजगरास पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.
तारकर्ली येथील मिठबावकर यांच्या घरानजीक लावण्यात आलेल्या एका जाळ्यात आज दुपारी अजगर अडकला असल्याचे मिथिलेश मिठबावकर याला दिसून आले. त्याने त्या अजगराची जाळ्यातून सुटका करत भाऊ सुनील मिठबावकर याच्या मदतीने देवली येथील जंगलमय भागात सोडून दिले.

3

4