दोन कोटीच्या जुन्या नोटा बाळगल्याप्रकरणी पनवेल येथील युवकाला गोव्यात अटक

328
2
Google search engine
Google search engine

पणजी,ता.०८: सुमारे दोन कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बाळगल्याप्रकरणी पनवेल येथील एका तरुणाला गोवा पोलिसांनी आज सकाळी रेल्वेस्थानकावर अटक केली.त्याच्याकडे १ कोटी ९९ लाख ९२ हजार रुपये जुना नोटा आढळून आले आहेत. लवू चव्हाण असे त्याचे नाव आहे.
रेल्वे पोलिस आज नियमित पाहणी करत असताना करमळी इथून मुंबईला जाणाऱ्या उन्हाळी विशेष गाडीमध्ये लवू चव्हाण बसलेल्या ठिकाणी एक बॅग आढळली. रेल्वे पोलिसांनी चव्हाणला ती बॅग उघडून दाखवण्यास सांगितली. मात्र त्याने त्याला नकार दर्शवला. जेव्हा रेल्वे पोलिसांनी ती बॅग उघडली. त्यावेळी त्यात नोटाबंदीनंतर व्यवहारातून बाद ठरवलेल्या जवळपास २ कोटी रुपयांच्या १ हजार आणि ५०० रुपयांच्या नोटा आढळून आल्या.
चव्हाणच्या बॅगेत १ हजारच्या १९ हजार ९८५ नोटा आणि ५०० च्या १४ नोटा मिळून १ कोटी ९९ लाख ९२ हजार रुपयांच्या जुन्या नोटा आढळून आल्या.
रेल्वे पोलिसांनी चव्हाणला स्थानिक पोलिसांकडे सुपुर्द केले आहे.स्थानिक पोलिस पुढील कारवाई करणार आहेत. रेल्वे पोलिस दलाच्यावतीने हेड कॉन्स्टेबल विश्राम देसाई आणि डी. एस. मीना यांनी ही कारवाई केली.