Thursday, October 10, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासिंधुदुर्गात प्रथमच आंबडोसमध्ये ड्रोनच्या सहाय्याने पाणी स्रोतांचे सर्व्हेक्षण

सिंधुदुर्गात प्रथमच आंबडोसमध्ये ड्रोनच्या सहाय्याने पाणी स्रोतांचे सर्व्हेक्षण

जागतिक पर्यावरण दिनी ५ जून रोजी झाला शुभारंभ
ड्रोनएज संस्थेचा पुढाकार

सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी
मालवण तालुक्यातील आंबडोस या प्रसिद्ध गावातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी ड्रोनएज या संस्थेने येथील पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांचा सर्व्हे करण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र, हा सर्व्हे ड्रोन कमेऱ्यांच्याद्वारे करण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात असा प्रयत्न प्रथमच होत असून यासाठी राज्यभरातील अन्य संस्थांचा सहभाग लाभत आहे. ५ जून या जागतिक पर्यावरण दिनी व ६ जून रोजी हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. सरपंच राधा वरवडेकर यांच्यासह गावचे माजी सरपंच, ग्राम पंचायत सदस्य व तरुण वर्गाचा याला उत्तम प्रतिसाद लाभत आहे.
ड्रोनएज हि एक पर्यावरण संरक्षण संस्था आहे. त्याचे संस्थापक – लक्ष्मण आरोसकर ( रा. मुंबई ) हे आंबडोस गावचेच मूळ रहिवाशी आहेत. आरोसकर हे ड्रोन विषयीची माहिती आणि त्याचे उपयोग सर्व लोकांन पर्यंत पोहचवणे हे काम या संस्थेच्या माध्यमातून करीत आहेत. आंबडोस हे सिंधुदुर्गातील पहिले गाव असेल कि जिथे या अद्ययावत तंत्रज्ञाचा वापर करून पाणी टंचाईवर उपाययोजना करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ५ व ६ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमीत्त गाव आंबडोस या ठिकाणी ड्रोनचा आणि ऐ.आय. चा वापर करून पाणी आणि त्याचे स्रोत याचे फोटो आणि विडिओ माहिती जमा करण्यात आली. त्यावर हि संस्था संशोधन करून पाण्याच्या समस्येवर उपाययोजना करणार आहेत. हि संस्था त्याच गावातील होतकरू तरुण वर्ग यांना ड्रोन प्रशिक्षण देणार आहे.
तसेच पाणी संवर्धन आणि त्याचे महत्व या विषयी माहिती गावातील लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करणार आहे.
ड्रोनएज या संस्थेसोबत भ्रमर संस्था ठाणेचे अनुप मालंडकर, डी आर संस्थेच्या रुची सक्सेना, इंडियाफ्लाईन्गलॅब चे निखिल ड्रोन लॅब (अहमदाबाद), एरियल एडज मुंबईचे प्रशांत सोनी, जी-टेकचे सौरव गाला, स्कायमोशन मुंबईचे लक्ष्मण आरोसकर, अनुप्रिया आयआयटी दिल्लीच्या हिमांशू अशा अनेक संस्था या कामात हातभार लावत आहेत.
आंबडोस येथे राबविलेल्या उपक्रमाला तरुण वर्ग आणि अनुभवी जेष्ठ अशा दोन्हीचे मार्गदर्शन लाभले. यात
सरपंच राधाबाई वरवडेकर, उपसरपंच भरती आयरे, सदस्य शीतल कदम अनुभवी जेष्ठ व्यक्ती माजी सरपंच विष्णू परब, माजी सरपंच दिगंबर नके, माजी सरपंच दिलीप परब, कृृषी सहाय्यक गावडे, रामकृष्ण परब, धोंडी नाईक, धानजी चव्हाण, तरुण वर्ग विशाल धुरी, धनजंय नाईक, प्रशांत कदम, रामदास नाईक, दीपक पर्बत, प्रवीण मराळ, सुमित परब, प्रशांत नाईक व इतर तरुण मंडळी तसेच इतर ग्रामस्थ यांचा सहभाग लाभला.
आंबडोस या गावाने एकीच्या जोरावर शासनाच्या अनेक उपक्रमात यश संपादन केले आहे. जलस्वराज्य प्रकल्प यशस्वी करतानाच तंटामुक्त अभियान, पर्यावरण विकासरत्न, यशवंत पंचायतराज अभियान, तसेच संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. आंबडोस गावाची रचना वेगळी आहे. डोंगराळ भागात वसलेल्या या गावात बारमाही वाहते पाणी नाही. परिणामी मुबलक व पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या उन्हाळ्यात जाणवते. त्यामुळे गावातील पाण्याच्या स्त्रोतांचा संवर्धन होणे गरजेचे आहे. ड्रोनएज संस्थेने घेतलेल्या उपक्रमाला गावातील नागरिक यशस्वी करतील, असे पूर्वानुभवावरून म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments