वेंगुर्लेत भाजपा किसान मोर्चा-सिंधुदुर्ग आयोजित कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाला उस्फूर्त प्रतीसाद

2

 

जिल्हातील पदाधिकारी व शेतकरी बांधवांचा सहभाग

वेंगुर्ले : ता. ८
वेंगुर्ले येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात आयोजित केलेल्या किसान मोर्चाच्या प्रशिक्षण कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हातील पदाधिकारी व शेतकरी यांनी उपस्थिती दर्शवुन प्रशिक्षण वर्ग यशस्वी केला.
वेंगुर्ले नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजन गिरप व भाजपा चे प्रदेश कार्यालयीन सहसचिव शरदजी चव्हाण यांच्या हस्ते प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ करण्यात आला . यावेळी मान्यवर म्हणून प्रा.फ.सं.केंद्राचे बी.एन.सावंत , किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब सावंत , तालुकाध्यक्ष प्रसंन्ना देसाई , जिल्हा उपाध्यक्ष बाबा मोंडकर , दिपा काळे , वेंगुर्ले आत्मा कमिटी अध्यक्ष संतोष शेटकर , चिटनीस उमेश सावंत , जेष्ठ नेते बाळा सावंत , महादेव शेगले गुरूजी , ता.सरचिटणीस प्रशांत खानोलकर उपस्थित होते.
यावेळी डाॅ. बि.एन.सावंत यांनी प्रादेशिक फळ संशोधन केंद्राची संशोधनात्मक वाटचालीची माहिती दिली , तसेच डाॅ. बा.सा.को. क्रु. वि. दापोलीचे प्राध्यापक डाॅ. सोमनाथ सोनवणे यांनी काजू बोंडापासुन इथेनॉल निर्मिती यावर विस्त्रुतपणे विवेचन केले . या प्रशिक्षण वर्गाला किसान मोर्चा वेंगुर्ले अध्यक्ष सचिन दळवी ,की.मो.कुडाळ अध्यक्ष गुरुनाथ पाटील , की.मो.मालवण अध्यक्ष किशोर नरे , की.मो.सावंतवाडी अध्यक्ष तुकाराम आमुणेकर , की. मो.दोडामार्ग अध्यक्ष डाॅ. बाबासाहेब राणे , की. मो.मालवण ता. उपाध्यक्ष शशिकांत शिंदे , रामघाट फार्मर प्रो.कं.दोडामार्ग चे मयुर नाईक व यशवंत धर्णे , की.मो.मालवण सरचिटणीस सत्यवान चव्हाण , जिल्हा उपाध्यक्ष राजू राऊळ , नितीन भारती , रामचंद्र पाटकर ,मोहन जाधव , बापु वारंग , सचिन म्हारव , सुवर्णा पवार , कमलाकांत प्रभु , सुनील घाग , दिनेश शिंदे , ओंकार चव्हाण , सदानंद राऊळ – सुकळवाड , राजेश पेडणेकर – कोटकामते, देवगड , प्रकाश राणे , सुनीत गावडे- गोवेरी , देवेंद्र परब – गोवेरी , चंद्रशेखर पेडणेकर- मालवण , सुनील गावडे – अणसुर , अशोक शिरवंडेकर- मालवण , सुभाष राऊळ- खानोली इत्यादी उपस्थित होते.

4