वेंगुर्ले तालुक्याचा दहावीचा निकाल ९३.६६ टक्के

270
2
Google search engine
Google search engine
Google search engine

पाच हायस्कुलचा निकाल १०० टक्के

वेंगुर्ला, ता. ८ : तालुक्याचा दहावीचा निकाल ९३.६६ टक्के इतका लागला आहे. परीक्षेस बसलेल्या एकूण ९१६ पैकी ८५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्यातील पाच शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
वेंगुर्ले तालुक्यात या वर्षीही दहावीच्या परीक्षेत विध्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवून तालुक्याचे नाव शिक्षण क्षेत्रात आघाडीवर नेले आहे. १०० निकाल लावलेल्या शाळांमध्ये आर.के. पाटकर हायस्कुल, के. के. चमणकर हायस्कुल, अणसुर- पाल हायस्कुल अणसूर, सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कुल व मदर तेरेसा इंग्लिश मिडीयम स्कुल या शाळांचा समावेश आहे.
दरम्यान तालुक्यातील अन्य शाळांमध्ये वेंगुर्ला हायस्कुल वेंगुर्ला ९७.३८ टक्के निकाल, गुरुवर्य अ. वि. बावडेकर विद्यालय शिरोडा ८९.०६ टक्के निकाल, विद्यामंदिर परुळे ९३.४४ टक्के निकाल, श्री शिवाजी हायस्कुल तुळस ९५.६५ टक्के निकाल, श्री देवी सातेरी हायस्कुल वेतोरे ९१.५९ टक्के निकाल, श्री माऊली विद्यामंदिर रेडी ७८.७८ टक्के निकाल, डॉ. आर. डी. खानोलकर हायस्कुल ८८.२३ टक्के, न्यू इंग्लिश स्कुल उभादांडा ९७.३३ टक्के निकाल, श्री सरस्वती विद्यालय आरवली ८९.४७ टक्के निकाल, दाभोली हायस्कुल दाभोली ८६.२० टक्के निकाल, एस. के. पाटील विद्यामंदिर केळुस ९२.५० टक्के निकाल, न्यू इंग्लिश स्कुल मातोंड ९४.७३ टक्के निकाल, आसोली हायस्कुल असोली ८८.५७ टक्के निकाल लागला आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

\