8 शाळांचा निकाल 100 टक्के : तालुक्यात दिव्या राणे प्रथम
कणकवली, ता. 8 : दहावी परीक्षेत कणकवली तालुक्याचा निकाल 92.12 टक्के लागला आहे. तर शहरातील विद्यामंदिर हायस्कूलची दिव्या विजय राणे हिने 99.60 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर सेंट उर्सूला हायस्कूलची तन्वी पेडणेकर हिने 98 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक आणि आयडियल इंग्लिश स्कूलची आर्या विद्याधर तायशेटे हिने 97.80 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे.
कणकवलीतील गुणवंत विद्यार्थ्यामध्ये विद्यामंदिर हायस्कूलची मृणाली मंगेश तेली हिने 97.20 टक्के, साक्षी निवृत्ती गुरव (विद्यामंदिर हायस्कूल) 96.80 टक्के, अवधूत सुनील घुगरे (एस.एम.हायस्कूल) 96.40 टक्के यांचा समावेश आहे.
कणकवली तालुक्यात 29 माध्यमिक शाळा आहेत. यातील 8 शाळांचा निकाल 100 टक्के लागला. यामध्ये नरडवे हायस्कूल, शिवडाव हायस्कूल, बिडवाडी हायस्कूल, शंकर महादेव कुंभवडे ,घोणसरी विद्यालय, आदर्श विद्यालय करंजे, आणि नडगिवे स्कूल या शाळांचा समावेश आहे.
कणकवली तालुक्यातील शाळानिहाय निकाल असा आहे : एस.एम. हायस्कूल 86.32 टक्के, विद्यामंदिर हायस्कूल 88.88 , खारेपाटण मफतलाल हायस्कूल 94.24 टक्के, फोंडाघाट इंग्लिश स्कूल 97.61 टक्के, माध्यमिक विद्यामंदिर कनेडी 97.40 टक्के, कळसुली न्यू इंग्लिश स्कूल 96.05 टक्के, माध्यमिक विद्यालय कासार्डे 85.31 टक्के, सरस्वती विद्यालय नांदगाव 90.90 टक्के, माध्यमिक विद्यामंदिर हरकुळ खुर्द 96.15 टक्के, ल.गो सामंत हरकुळ बुद्रूक 90टक्के, वामनराव महाडिक तळेरे 83.72 टक्के, नाथ पै स्कूल करूळ 88.63 टक्के, आदर्श विद्यालय सावडाव 86.20 टक्के, नाटळ विद्यालय 91.66 टक्के, न्यू इंग्लिश बोर्डवे 85.29 टक्के, वारगाव विद्यालय 96.87 टक्के, उर्दू हरकुळ ब्रुदुक 96.55 टक्के, लोरे वाघेरी हायस्कूल 95.23 टक्के, सेंट उर्सुला वरवडे 95.61 टक्के, बाल शिवाजी कणकवली 92.85 टक्के आणि आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे 94.86 टक्के