परुळे हायस्कुलची सिद्धी माड्ये ९७.४० टक्के गुणांनी तालुक्यात प्रथम 

357
2
Google search engine
Google search engine
Google search engine

दहावीच्या परीक्षेत वेंगुर्ले तालुक्याचा ९३.६६ टक्के निकाल : पाच शाळांचा १०० टक्के निकाल

वेंगुर्ले, ता. ८ : मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांन्त प्रमाणपत्र परिक्षेत वेंगुर्ले तालुक्याचा निकाल ९३.६६ टक्के लागला आहे. तालुक्यातील तब्बल अठरा विद्यालयां पैकी पाच विद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला असून १८ हायस्कूलमधून ९१६ विद्यार्थी या परीक्षेस बसले होते. त्यापैकी ८५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरम्यान तालुक्यात परुळे हायस्कुलची सिद्धी वासुदेव माड्ये हिने ९७.४० टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. तर द्वितीय क्रमांक वेतोरा हायस्कुलची चिन्मयी रामकृष्ण प्रभुआजगावकर हिने ९७ टक्के, तृतीय क्रमांक परुळे हायस्कुलची नम्रता भानुदास बिड्ये व वेतोरे हायस्कुलची श्रावणी संजय बागायकर या दोघींनी ९४.४० गुण मिळवून संयुक्तपणे मिळविला आहे. चतुर्थ क्रमांक शिरोडा हायस्कुलची श्वेता अवधुत येनजी ९४.२० टक्के गुण मिळविले तर वेंगुर्ला हायस्कुलची विद्यार्थीनी रिया दिलीप राणे ९४ टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांक पटकाविला आहे. यासह सर्व उर्त्तीर्ण विद्यार्थ्यांचे तालुक्यातून अभिनंदन होत आहे.
प्रत्येक हायस्कूल निहाय निकाल याप्रमाणे- अ. वी. बावडेकर विद्यालय शिरोडा यामधून १२८ पैकी ११४ विद्यार्थी उत्तीर्ण होवून ८९.०६ टक्के निकाल लागला आहे. यामध्ये श्वेता अवधुत एनजी हिने ९४.२० टक्के मिळवून हायस्कुलमध्ये प्रथम येण्याचा मान पटकाविला तर द्वितीय क्रमांक आत्माराम चंद्रकांत कांबळी ९२. २०० टक्के तर तृतीय क्रमांक अनघा श्रीगुरू प्रभुसाळगांवकर हिने ९१.६० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
श्री देवी सातेरी हायस्कूल वेतोरे मधून ११९ पैकी १०९ विद्यार्थी उर्त्तीण होऊन हायस्कूलचा निकाल ९१.६९ टक्के लागला आहे. यामध्ये प्रथम क्रमांक चिन्मयी रामकृष्ण प्रभुआजगांवकर ९७ टक्के, द्वितीय क्रमांक श्रावणी संजय बागायतकर ९४.४० टक्के, तृतीय क्रमांक वैश्णवी शिवराम वराडकर व वेदांग महेश बोवलेकर या दोघांनी प्रत्येकी ९२.४० टक्के गुणमिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
कृषिरत्न काकासाहेब चमणकर हायस्कूल आडेली मधून ४४ पैकी ४४ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल लागला आहे. यामध्ये प्रथम संगिता ज्ञानेश्वर डिचोलकर ८४.८० टक्के, द्वितीय गायत्री संतोष धर्णे ८४.६० टक्के, तर स्वप्नील विष्णु कोंडसकर व विशाखा विश्वनाथ धर्णे या दोघांनी अनुक्रमे ८४.४० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
डॉ.रा. धो. खानोलकर मठ हायस्कूल यामधून १७ पैकी १५ विद्यार्थी उत्तीर्ण होवून ८८.२३ टक्के निकाल लागला आहे. यामध्ये प्रथम जितेश रमाकांत आडेकर याने ८८. ६० टक्के, द्वितीय बाळकृष्ण नरेंद्र नाईक याने ८६.६० टक्के मिळविले तर तृतीय क्रमांक वेदा सुहास तेंडोलकर हिने ८३.४० टक्के गुण मिळविले आहेत.
न्यू इंग्लिश स्कूल मातोंड हायस्कूलचा निकाल ९४.७३ टक्के लागला आहे. यामध्ये प्रथम क्रमांक तन्वी यशवंत वाटवे ८२.२० टक्के गुण मिळवून मिळविला आहे. तर द्वितीय क्रमांक समिक्षा लाडू सावळ हिला ८०.८० टक्के व वैभवी श्रीराम मातोंडकर हिने ७९.२० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
शिवाजी हायस्कूल तुळस हायस्कुलचा निकाल ९५.६५ टक्के लागला आहे. परिक्षेस बसलेली २३ पैकी २२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये विनय यशवंत पवार व मानसी शांतीकुमार तुळसकर या दोघांनी ८५.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर कुसाजी प्रकाष गवस याने ८०.८० टक्के गुण मिळवून व्दितीय क्रमांक, तर अक्षता अशोक सावंत हिने ७९.४० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
सिंधुुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीअम स्कूल वेंगुर्लेचा  १५ पैकी १५ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल लागला आहे. यामध्ये प्रथम क्रमांक प्रबल अरविंद बिराजदार याने ९१ टक्के, द्वितीय क्रमांक निकिता संजिवन तुळसकर ८९. ४० टक्के तर सानिका रामचंद्र साळगांवकर हिने ८८.४० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
उभादांडा न्यू इंग्लीश स्कूल-उभादांडा यामधून ७५ पैकी ७३ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन हायस्कूलचा निकाल ९७.३३ टक्के लागला आहे. यामध्ये मैथिली मेघशाम मांजरेकर हिने ९२.८० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. निरज चंद्रशेखर नाईक याने ८८ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर कुणाल रमेश तोरसकर याने ८६.२० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परूळे हायस्कूल मधून ६१ पैकी ५७ विद्यार्थी उर्त्तीण होऊन हायस्कूलचा निकाल ९३.४४ टक्के लागला आहे. यामध्ये सिध्दी वासुदेव माड्ये हिने ९७.४०टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांक वैष्णवी विरसेन देसाई ९४.४० टक्के व दर्शन गणेश राणे याने ९३ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
श्री सरस्वती विद्यालय आरवली टांक मधून १९ पैकी १७ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन हायस्कूलचा निकाल ८९.४७ टक्के निकाल लागला आहे. यामध्ये प्रथम क्रमांक ऋग्वेद ह्दयनाथ गोडकर ९१.४०,द्वितीय रोहन सावळराम गोडकर ७८.२० व रिबीका रॉबट फर्नांडीस प्रत्येकी ७४.४० टक्के गुण मिळविले आहेत.
श्री माऊली विद्यामंदिर रेडी मधून ३३ पैकी २६ विद्यार्थी उत्तीर्ण ७८.७८  टक्के निकाल लागला आहे. यामध्ये प्रथम क्रमांक गौरी अनंत कांबळी ८६ टक्के, द्वितीय शारदा प्रमोद नाईक ८५ टक्के तर तृतीय तनया संतोष कांबळी ८२.४० टक्के गुण मिळविले आहेत.
स. का. पाटील केळूस हायस्कूल मधून ४० पैकी ३७ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन विद्यालयाचा निकाल ९२.५० टक्के लागला आहे. यामध्ये प्रथम अरुण बाळकृष्ण आरोलकर ८३.८० टक्के,द्वितीय क्रमांक संतोष मनोहर धुरी ८३.२० व तृतीय क्रमांक प्राजक्ता प्रकाश मातोंडकर ८२.८० टक्के गुण मिळविले आहेत.
रा.कृ. पाटकर हायस्कूल मधून ५० पैकी ५० विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल लागला. यामध्ये प्रथम प्रणव गोपाळ दाभोलकर याने ९२.४० टक्के गुण मिळवून हायस्कुलमध्ये प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. तर द्वितीय क्रमांक केतकी राकेश परुळेकर ८९.६० तर पुर्वा श्रीकांत रानडे ८६.२० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.
दाभोली न्यू इंग्लिश स्कूल दाभोली मधून २९ पैकी २५ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन विद्यालयाचा निकाल ८६.२० टक्के लागला आहे. यामध्ये प्रथम शैलेश बोवलेकर ८९ टक्के, द्वितीय क्रमांक सर्वेश कांबळी ८६.६० टक्के तर तृतीय क्रमांक वृषाली कांदळकर ८१ टक्के गुण मिळवून उर्त्तीण झाली आहेत.
अणसूरपाल हायस्कूल अणसूर मधून २८ पैकी २८ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. यामध्ये प्रथम क्रमांक स्नेहल पालकर ९२ टक्के गुण, द्वितीय रुचिता देऊलकर ८३.४० टक्के गुण तर अनीषा परब हिने ७८.६० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहेत.
आसोली हायस्कूल आसोली मध्ये ३५ पैकी ३२ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन हायस्कूलचा निकाल ८८ टक्के लागला आहे. यामध्ये प्रथम मैथीली भरत गावडे ९८.२०, द्वितीय गणेश संतोष नाईक ८६ टक्के तर तृतीय क्रमांक निकिता दिलीप धुरी ७९.८० टक्के गुण मिळविले आहेत.
वेंगुर्ले हायस्कूल मधून १५३ पैकी १५१ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९७ टक्के निकाल लागला. यामध्ये अनुक्रमे प्रथम रिया दिलीप राणे ९४ टक्के, द्वितीय सर्वेश राजाराम गावडे ९३ टक्के, निकिता राजेंद्र निनावे ९०.८० टक्के गुण मिळवून उर्त्तीर्ण झाली आहेत.
मदर तेरेसा इंग्लिश मिडीअम स्कुलचा निकाल २८ पैकी ४६ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल लागला आहे. यामध्ये प्रथम प्रकाश भानुशाली ८८.४०, द्वितीय ओम रुपेश नेर्लेकर ८७ टक्के तर तृतीय लीसा फ्रान्सीस डिसोजा ८५.६० टक्के गुण मिळविले आहेत.

\