दोडामार्ग तालुका शिवसेनेचा उद्या कृतज्ञता मेळावा

2

दोडामार्ग,ता. ०८ : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा संसदेवर खासदार म्हणून निवडून गेलेले विनायक राऊत यांच्या उपस्थितीत रविवारी दिनांक 9 जून रोजी दोडामार्ग तालुका शिवसेनेचा कृतज्ञता मेळावा होणार आहे. दोडामार्ग बाजारपेठेतील महालक्ष्मी सभागृहात हा मेळावा होणार असून यावेळी श्री. राऊत यांचे जल्लोषी स्वागत करण्यात येणार आहे. तरी शिवसैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका प्रमुख बाबुराव धुरी यांनी केले आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून सलग दुसऱ्यांदा मोठ्या मताधिक्क्याने विनायक राऊत निवडून आले. त्यानंतर प्रथमच कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यासाठी खासदार विनायक राऊत रविवारी (ता. 9) दोडामार्ग तालुक्यात येत आहेत. दुपारी 12:30 वा. महालक्ष्मी सभागृहात कृतज्ञता मेळावा होणार आहे. तर त्यानंतर दुपारी 1:30 वा. च्या सुमारास तेरवण-मेढे उन्नेयी बंधारा येथे चांदा ते बांदा योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विश्रामगृहाच्या नूतनीकरणाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. तरी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी केले आहे.

2

4