वैभववाडी तालुक्याचा दहावीचा ८८.६१ टक्के निकाल

359
2
Google search engine
Google search engine

 

भुईबावडा गावची सुकन्या तेजस्वी मोरे तालुक्यात प्रथम

वैभववाडी, ता. ०८ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा वैभववाडी तालुक्याचा ८८.६१ टक्के निकाल लागला आहे. तालुक्यातील १८ विदयालयातून एकूण ६५० विदयार्थी परीक्षेस बसले होते. यापैकी ५७६ विदयार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्यातून अभिनव विद्या मंदिर सोनाळीची कु.तेजस्वी दिलीप मोरे ९५ टक्के गुण मिळवत प्रथम तर अ.रा.विदयालयाचा शार्दुल संतोष कोलते ९३.८० टक्के गुण मिळवत दुसरा आला. तसेच नेहा राजेंद्र रावराणे ९३.६० टक्के गुण मिळवित तिसरी आली आहे. तालुक्यातील मांगवली, कुर्ली, नानिवडे व ऊर्दु कोळपे विदयालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे. याही वर्षी मुलींनीच बाजी मारली आहे.

तालुक्यातील माध्यमिक विद्यालय निहाय निकाल पुढीलप्रमाणे आहे. माध्यमिक विद्यालय करुळ या विद्यालयात ४२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. पैकी ३४ विद्यार्थी पास झाले आहेत. या विद्यालयाचा निकाल ८०.८५ टक्के लागला आहे. या विद्यालयातून विनिता मोहन राणे हिने ९०.६० टक्के गुण मिळवीत प्रथम क्रमांक मिळविला आहे. तर अभय गजानन तोरस्कर ८८.८५ टक्के व मनोज विजय चव्हाण ८७.४५ टक्के हे अनुक्रमे द्वितीय व तृतीय आले आहेत.
विकास विद्यालय सडुरे अरुळे या विद्यालयातून ३५ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. पैकी २९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयाचा ८२.८५ टक्के निकाल लागला आहे. या विद्यालयातून सलोनी भास्कर सावंत ८४.२० टक्के गुण मिळवीत प्रथम आली आहे. प्रणय प्रकाश मिराशी याने ७७.८५ टक्के गुण मिळवून द्वितीय तर प्रथमेश दिनेश जंगम ७३ टक्के गुण मिळवित तृतीय आला आहे.
न्यू इंग्लिश स्कूल हेत या विद्यालयातून ३४ विद्यार्थी परीक्षेस बसले होते पैकी ३० विद्यार्थी उत्तीर्ण होत या विद्यालयाचा ८८.२३ टक्के निकाल लागला आहे. या विद्यालयातून प्रवीण वासुदेव नागप ८८ टक्के गुण प्रथम आला आहे. तर अस्मिता अशोक पाटेकर ८२.४५ टक्के गुण व सायली रमेश पांचाळ ८२ टक्के या अनुक्रमे द्वितीय व तृतीय आले आहेत.
अभिनव विद्यामंदिर सोनाळी या इंग्रजी माध्यमाच्या विद्यालयातून ४१ विद्यार्थी परीक्षेस बसले होते पैकी ३८ विद्यार्थी उत्तीर्ण होत या विद्यालयाचा ९२.६८ टक्के निकाल लागला आहे. या विद्यालयातून तेजस्विनी दिलीप मोरे हीने ९५ टक्के गुण मिळवित विद्यालय सह तालुक्यात प्रथम आली आहे. तर नेहा राजेंद्र रावराणे हिने ९३.६० टक्के गुण मिळवित विद्यालयात द्वितीय तर तालुक्यात तृतीय क्रमांक मिळविला आहे. तरी इतिशा मनोज पेडणेकर ९० टक्के गुण मिळवित विद्यालयातून तृतीय क्रमांक मिळविला आहे.
अर्जून रावराणे विद्यालय वैभववाडी या विद्यालयातून ६४ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. पैकी ५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयाचा ८५.९३ टक्के निकाल लागला आहे. या विद्यालयातून शार्दुल संतोष कोलते याने ९३.८० टक्के गुण मिळवित विद्यालयात प्रथम तर तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळविला आहे. तर तन्वी नंदकुमार कोळसुकर ९२.६० टक्के तर योगेश्री सुनील केळकर ८०.४० टक्के गुण मिळवित अनुक्रमे द्वितीय व तृतीय आले आहेत.
मधुकर भुर्के माध्यमिक विद्यालय मांगवली या विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या विद्यालयातून २८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यालयाने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. या विद्यालयातून सोहम अनंत सुतार ९०४० टक्के गुण मिळवीत प्रथम आला आहे. तर अविष्कार शरद कांबळे ८०.३० टक्के व स्वराली प्रसाद जावडेकर ८२.४५ टक्के गुण मिळवित अनुक्रमे द्वितीय व तृतीय आले आहेत.
नव भारत हायस्कूल कुसुर या विद्यालयातून १९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. पैकी १४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यालयाचा ७३.६८ टक्के निकाल लागला आहे. तालुक्यात सर्वात कमी या विद्यालयाचा निकाल आहे. या विद्यालयातून मयुरी मुरारी साळुंखे ७७.४५ टक्के गुण मिळवित विद्यालयात प्रथम आली आहे. अविनाश दत्‍ताराम सावंत ७६.२५ टक्के गुण द्वितीय तर दिव्या अजित दळवी ७०.८० टक्के गुण मिळवित तृतीय आली आहे.
श्री स्वामी विवेकानंद हायस्कूल तिथवली या विद्यालयातून २७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. पैकी २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा ७७.७७ टक्के निकाल लागला आहे. या विद्यालयातून प्रयाग विजय हरियाण याने ८३.८० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. तर शंभवी सुनील पाटणकर ८२.२० टक्के व अश्विनी दिलीप माने ८१.६० टक्के गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय आले आहेत.
कुर्ली माध्यमिक विद्यालय कुर्ली या विद्यालयातून २० विद्यार्थी परीक्षेस बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होत विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या विद्यालयातून विनीत विजय सकपाळ ८७ टक्के गुण मिळ

Sid, [08.06.19 18:19]
वित विद्यालयात प्रथम आला आहे. तर अर्पिता अनिल बागवे ८२ टक्के व अश्विनी महादेव देवळी ८०.८० टक्के गुणांसह अनुक्रमे द्वितीय व तृतीय आल्या आहेत.
माध्यमिक विद्यालय लोरे या विद्यालयातून ४२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. पैकी ३८ विद्यार्थी उत्तीर्ण होत विद्यालयाचा ९०.४७ टक्के निकाल लागला आहे. या विद्यालयातून विशाखा विजय नेमन ८४.६० टक्के गुणांसह प्रथम आली आहे. मीनाक्षी अशोक सावंत ७७.०५ टक्के गुण मिळवीत द्वितीय तर निखिल दत्ताराम गोरुले व वेदिका विजय वाडेकर यांनी ७६.८० टक्के गुण मिळवून संयुक्त तृतीय क्रमांक मिळविला आहे.
यशवंतराव चव्हाण विद्यालय आचिर्णे या विद्यालयातून ४१विद्यार्थी परीक्षेस बसले होते. पैकी ४० विद्यार्थी उत्तीर्ण होत विद्यालयाचा ९७.५६ टक्के निकाल लागला आहे. या विद्यालयातून पूजा चंद्रकांत कदम हिने ९१.६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. तर रेश्मा महेश धुळप ८२.८०टक्के चिनार मोहन रावराणे ८१.८० टक्के गुणांसह अनुक्रमे द्वितीय व तृतीय आले. आहेत.
आदर्श विद्या मंदिर भुईबावडा या विद्यालयातून ३६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. पैकी ३४ विद्यार्थी उत्तीर्ण होत विद्यालयाचा ९४.२५ टक्के निकाल लागला आहे. या विद्यालयातून अंकिता यशवंत नारकर हिने ८४.६० टक्के गुण मिळवित विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. तर क्षितिजा समीर कांबळे ८३.४० टक्के गुण व ऋषिकेश आदिनाथ गुरव ७६.४५ टक्के गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय आले आहेत.
सरदार अरविंद सावंत माध्यमिक विद्यालय नाधवडे या विद्यालयातून ३३ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. पैकी २९ विद्यार्थी उत्तीर्ण होत विद्यालयाचा ८७.८० टक्के निकाल लागला आहे. या विद्यालयातून रीना संतोष पांचाळ ८२.४० टक्के गुण मिळवत प्रथम आली आहे. दीप्ती दिलीप नाचणेकर व प्रणया प्रभाकर इस्वलकर या दोघांनी संयुक्त ७८.८० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला आहे. तर अक्षय राजेश तावडे याने ७७.२०टक्के गुण मिळवून तृतीय आला आहे.
माध्यमिक विद्यालय उंबर्डे या विद्यालयातून २६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. पैकी २४विद्यार्थी उत्तीर्ण होत विद्यालयाचा ९२.३० टक्के निकाल लागला आहे. या विद्यालयातून मीनाक्षी बंदरकर हिने ८५.६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. तर सिद्धी कुडाळकर ८३.६० टक्के गुण व अक्षय मोपेरकर ८० टक्के गुण हे अनुक्रमे द्वितीय व तृतीय आले आहेत.
माधवराव पवार विद्यालय कोकिसरे महाविद्यालयातून सर्वात जास्त ८९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. पैकी ७१ विद्यार्थी उत्तीर्ण होत विद्यालयाचा ७९.७७ टक्के निकाल लागला आहे. या विद्यालयातून कुमारी प्राची प्रकाश पाटील ९० टक्के गुण मिळवत प्रथम आली आहे. राजवर्धन सुनिल काटकर ८९.४० टक्के गुण मिळवत द्वितीय तर तन्वी सुनिल भोगले ८७.८० टक्के गुण मिळवत तृतीय आली आहे.
शोभना नारायण विद्यालय नानिवडे या विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे. या विद्यालयातून ११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यालयातून सौरभ सुरेश कोकाटे विद्यार्थ्याने ८७.८० टक्के गुण मिळवीत प्रथम क्रमांक मिळविला आहे. तर जान्हवी प्रकाश वाडेकर ७६.८० टक्के व प्रसन्न शिवाजी गुरव ७६.६० टक्के गुणांसह अनुक्रमे द्वितीय व तृतीय आले आहेत.
उर्दू माध्यमिक विद्यालय उंबर्डे कोळपे या विद्यालयातून ३५ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. हे सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होत विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे. या विद्यालयातून फैजन मऊल पाटणकर ८४.४० टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे. फरदीन सदर ठाणगे ८२.३० टक्के गुण मिळवून द्वितीय तर नुरूनिसा पाटणकर ८० टक्के गुण मिळवून तृतीय आली आहे.
छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय नेर्ले या विद्यालयातून २७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. पैकी २५ विद्यार्थी उत्तीर्ण होत विद्यालयाचा ९२.५९ टक्के निकाल लागला आहे. या विद्यालयातून संदीप बबन बोडके याने ८२ टक्के गुण मिळवीत विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. तर गितेश प्रकाश पाटील व सुशांत संतोष घागरे यांनी ८०.६०टक्के गुण मिळवित संयुक्त द्वितीय क्रमांक मिळविला आहे. तर समीक्षा संतोष पाटील हिने ७९.६०टक्के गुण मिळवून तृत्तीय आली आहे.