मालवणात दहावीचा निकाल ९२.६३ टक्के

465
2
Google search engine
Google search engine
Google search engine

मालवण, ता. ८ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. तालुक्यातून १३३१ विद्यार्थ्यांपैकी १२३३ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९२.६३ टक्के निकाल लागला आहे. यात येथील अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूलची चैताली चौकेकर ९९.०४ टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम आली आहे. याच प्रशालेची श्रावणी यंदे ९७.०८ टक्के गुण मिळवून द्वितीय तर वेदिका चव्हाण ९७.०४ टक्के गुण मिळवून तृतीय आली आहे.
निकाल असा- अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूलचा निकाल ९४.३३ टक्के लागला यात चैताली चौकेकर (९९.०४ टक्के), श्रावणी यंदे (९७.०८ टक्के), वेदिका चव्हाण (९७.०४ टक्के) गुण मिळवित यश मिळविले. यात वेदिका चव्हाण हिने गणित व संस्कृत विषयात पैकीच्या पैकी गुण मिळविले तर चैताली चौकेकर, समृद्धी डिचवलकर, दत्तप्रसाद नाईक यांनी संस्कृत विषयात १०० गुण मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष आनंदकुमार चव्हाण, विजय कामत, प्रकाश प्रभू, मुख्याध्यापक मिलिंद अवसरे यांनी अभिनंदन केले. भंडारी हायस्कूल ८७.६२ टक्के निकाल लागला. यात जयेश पार्टे, गणेश परब (९२.८० टक्के), सुहाना मालपेकर (८९ टक्के), मृण्मयी वर्देकर (८८.८० टक्के) गुण मिळवून यशस्वी झाले. डॉ. कुडाळकर हायस्कूलचा निकाल ६० टक्के लागला. यात श्‍वेता सावंत (७५.४० टक्के), नेहा कांदळगावकर (७४.८० टक्के), प्रणव सुर्वे (६९.२० टक्के) गुण मिळवून यशस्वी झाले आहेत. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष नीलम राणे, मुख्याध्यापिका नंदिनी साटलकर, शिक्षकांनी अभिनंदन केले आहे. वराडकर हायस्कूल कट्टाचा निकाल ९१.७६ टक्के लागला. यात अदिती मुसळे (८८.८० टक्के), रोहन परब (८८.४० टक्के), धनंजय गावडे (८८.४० टक्के), सचिन गावडे (८६.८० टक्के), रोहिणी कुडतरकर (८६.८० टक्के) गुण मिळवून यशस्वी झाले. न्यू इंग्लिश स्कूल आचराचा निकाल ९५.४५ टक्के लागला. यात शुभम माळी (९३.८० टक्के), योगेश पेडणेकर (९२.४० टक्के), भक्ती गोसावी (९०.२० टक्के) गुण मिळवून यशस्वी झाले आहेत. टोपीवाला कन्याशाळाचा निकाल (७६.९२ टक्के) लागला. आर. पी. बागवे हायस्कूल मसुरेचा निकाल ८७.५० टक्के लागला. यात चैताली कुणकवळेकर (८३.८० टक्के), सानिका सावंत (८२.२० टक्के), सिद्धी मसुरकर (७५.४० टक्के), आदिती सांडव (७५.४० टक्के) गुण मिळवून यशस्वी झाले आहेत. भरतगड हायस्कूल मसुरेचा निकाल ८१.८१ टक्के लागला. यात साक्षी परब (८५.८० टक्के), रसिका सावंत (८१.२० टक्के), मयुरी घाडीगावकर (८० टक्के) गुण मिळवून यशस्वी झाले आहेत. सौ इं. द. वर्दम हायस्कूल पोईपचा निकाल ९४.८२ टक्के लागला. जनता विद्यामंदिर त्रिंबकचा निकाल ९४.८७ टक्के लागला. यात एैश्‍वर्या साटम (८५.४० टक्के), साहिल त्रिंबककर (८४.८० टक्के), वैभवी मेस्त्री (८३.६० टक्के) गुण मिळवून यशस्वी झाले. ओझर विद्यामंदिर कांदळगावचा निकाल ८७.५० टक्के लागला. यात धनश्री कांदळगावकर (८०.८० टक्के), गीतेश लाड (८४.४० टक्के), वृषभ धुरी (७०.४० टक्के) गुण मिळवून यशस्वी झाले. आर. ए. यादव हायस्कूल आडवलीचा निकाल ९६.२९ टक्के लागला. यात रूपाली मालंडकर (७९.२० टक्के), आशा परब (७७.६० टक्के), श्रद्धा सुतार (७७.२० टक्के) गुण मिळवून यशस्वी झाले. श्री शिवाजी विद्यामंदिर काळसेचा निकाल ९४.११ टक्के लागला. यात कृष्णा नाईक (९०.२० टक्के), श्रीधर गावडे (८९ टक्के), कौस्तुभ नाईक (८५.८० टक्के) गुण मिळवून यशस्वी झाले. सरस्वती विद्यामंदिर गावराई-सुकळवाडचा निकाल ८९.२८ टक्के लागला. माध्यमिक विद्यामंदिर असरोंडीचा निकाल ९२.३० टक्के लागला. भ. ता. चव्हाण हायस्कूल चौकेचा निकाल ९१.९२ टक्के लागला. यात संकेत चव्हाण (८७.२० टक्के), ईशा राणे (८६ टक्के), सीमाली परब (८५ टक्के) गुण मिळवून यशस्वी झाले. माध्यमिक विद्यालय बिळवसचा निकाल ८३.३३ टक्के लागला. यात जान्हवी पालव (९१.८० टक्के), ओंकार शिंदे (७३.४० टक्के), अमिता परब (७१.२० टक्के) गुण मिळवून यशस्वी झाले. न्यू इंग्लिश स्कूल पेंडूरचा निकाल ९७.३६ टक्के लागला. रामेश्वर विद्यामंदिर आचराचा निकाल ८५.७१ टक्के लागला. यात बॅनिता फर्नांडिस (८७.८० टक्के), सानिका आचरेकर (८७.४० टक्के), ऋतिका कुबल (७५.२० टक्के) गुण मिळवून यशस्वी झाले. न्यू इंग्लिश स्कूल माळगावचा निकाल ९० टक्के लागला. ज्ञानदीप विद्यालय हिवाळेचा निकाल ८३.३७ टक्के लागला. ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणीचा निकाल ९३.१० टक्के लागला. यात विवेक कांबळी (८१.२० टक्के), अनुष्का रेवंडकर (८१.२० टक्के), सौरभ मुंज (८० टक्के) गुण मिळवून यशस्वी झाले. सौ. हिराबाई भास्कर वरसकर हायस्कूल वराडचा निकाल ८०.१० टक्के लागला. यात राखी घाडी (८६ टक्के), सुविधा गावडे (८४.८० टक्के), प्रगती आळवे (८२.६० टक्के) गुण मिळवून यशस्वी झाले. न्यू इंग्लिश स्कूल देवबागचा निकाल १०० टक्के लागला. यात सारिका सारंग (८० टक्के), दीपक निवतकर (७९.८० टक्के), प्रणाली बांदेकर (७४.४० टक्के) गुण मिळवून यशस्वी झाले. रेकोबा हायस्कूल वायरीचा निकाल ९५.१२ टक्के लागला. यात जान्हवी करंगुटकर (८४.८० टक्के), शंकुतला केळुसकर (७९.२० टक्के), विपुल प्रभुलकर (७६.६० टक्के) गुण मिळवून यशस्वी झाले. शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाटचा निकाल ९७.२२ टक्के लागला. यात नीतल भांडे (९४ टक्के), साक्षी शिंदे (८६.६६ टक्के), अश्‍विनी पाटील (८२.४० टक्के) गुण मिळवून यशस्वी झाले आहेत. एस. एस. परब हायस्कूल खोटलेचा निकाल ८९.१८ टक्के लागला. रामेश्वर विद्यामंदिर तळगावचा निकाल ९६.६६ टक्के लागला. प्रगत विद्यामंदिर रामगडचा निकाल ९७.८२ टक्के लागला. त्रिमूर्ती विद्यालय शिरवंडेचा निकाल ९२.१० टक्के लागला. रोझरी इंग्लिश स्कूलचा निकाल १०० टक्के लागला. यात आकांशा नाईक (९५.२० टक्के), सानिका यादव (९३.४० टक्के), आशय परुळेकर (९२.२० टक्के) गुण मिळवून यशस्वी झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे फादर रिचर्ड सालढाणा यांनी अभिनंदन केले आहे. जयगणेश इंग्लिश मीडियम स्कूलचा निकाल ९६.७७ टक्के लागला. यात गौरवी परब (८६.६० टक्के), अनुराग गावकर (८५ टक्के), प्रांजल पाटील (८३.६० टक्के) गुण मिळवून यशस्वी झाले आहेत. वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल कट्टाचा निकाल १०० टक्के लागला. एन. एस. कावले इंग्लिश मीडियम आचराचा निकाल १०० टक्के लागला. यात मिहीर राऊळ (८९ टक्के), नेहा मुणगेकर (८३.४० टक्के), रिन्सी फर्नांडिस (८२.६० टक्के) गुण मिळवून यशस्वी झाले.

\