दहावी परीक्षेत सिंधुदुर्गचा निकाल 91.24 टक्के

274
2
Google search engine
Google search engine

जिल्ह्यात दिव्या राणे प्रथम, चैताली चौकेकर द्वितीय तर तन्वी पेडणेकर तृतीय

कणकवली, ता.8 : दहावी परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल 91.24 टक्के एवढा लागला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत मिळालेल्या माहिती नुसार जिल्ह्यात कणकवली विद्यामंदिर हायस्कूलची दिव्या विजय राणे हिने 99.60 टक्के गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. मालवणच्या टोपीवाला हायस्कूलची चैताली चौकेकर हिने 99.04 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर कणकवली तालुक्यातील वरवडे येथील सेंट उर्सुला स्कूलच्या तन्वी तुकाराम पेडणेकर हिने 98.20 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. मागील वर्षीच्या तुलनेत कोकण विभागाचा निकाल यंदा चक्क 5.80 टक्क्यांनी घटला आहे. तरीही सलग आठव्यांदा सिंधुदुर्ग जिल्हा दहावी निकालात सर्वोच्च स्थानी राहिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल 91.24 टक्के लागला. तर लगतच्या रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल 87 टक्के लागला. तर कोकण विभागाचा एकूण निकाल 88.38 टक्के एवढा आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 11287 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. यातील 10 हजार 298 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये विशेष गुणवत्ता यादीत 2,928 विद्यार्थ्याचा स्थान मिळाले. प्रथम श्रेणीत 3 हजार 997, द्वितीय श्रेणीत 2 हजार 738 आणि पास श्रेणीमध्ये 10 हजार 298 विद्यार्थी आहेत.
जिल्ह्यात वेंगुर्ले तालुक्याची 93.66 टक्के एवढी सर्वाधिक टक्केवारी राहिली. त्या पाठोपाठ सावंतवाडी 93.42 टक्के, मालवण 92.63 टक्के
कणकवली 92.12 टक्के, कुडाळ 91.52 टक्के, दोडामार्ग 91.31 टक्के, देवगड 87.68 टक्के, वैभववाडी 88.61 टक्के अशी टक्केवारी आहे.
दहावीच्या पुनपरीक्षार्थी निकाल 36.61 टक्के लागला आहे सिंधुदुर्गमधून 112 विद्यार्थी पुनर्परीक्षेला बसले होते यातील 41 जण उत्तीर्ण झाले.
विद्यार्थ्यांपैकी 41 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दहावी परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करावयाची आहे, त्यांनी 10 ते 19 जूनपर्यंत विहित नमुन्यातील अर्ज स्वसाक्षांकित गुणपत्रिकेची प्रत जोडून शुल्कासह विभागीय मंडळाकडे अर्ज सादर करावयाचे आहेत.