ऑनलाईन आयफोन घेवून पुण्यात दोघांकडुन बड्या कंपनीला 12 लाखाला चूना

2

एक सावंतवाडीचा तर दुसरा रत्नागिरीचा,:अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

 

सावंतवाडी, ता. ०८ : ऑनलाईन ऑर्डर केलेल्या महागडया आयफोन ऐवजी डुप्लीकेट फोन परत करून पुण्यात व्यावसाय करणा-या दोघा युवकांकडून एका कंपनीची तब्बल 11 लाख 89 हजारासाठी फसवणूक करण्यात आली आहे.
यात दोघा युवकांचा समावेश असून एक रत्नागिरीतील तर दुसरा सावंतवाडी येथील आहे.याप्रकरणी पुणे येथील अलंकार पोलीस ठाण्यात त्या दोघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार ऑनलाइन कंपनीच्या मॅनेजरकडून देण्यात आली आहे.
संबंधित ई-कॉमर्स कंपनीच्या कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार बनावट ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर वापरून संशयितांनी वेबसाइटवर अनेक खाती तयार केली. त्यांनी महागड्या वस्तू ऑर्डर केल्या. ई-कॉमर्स वेबसाइटच्या परतावा धोरण वापर करून, संशयितांनी कंपनी पॅकेजिंगमध्ये डुप्लीकेट उत्पादने पॅक केली आणि परत पाठविली. ऑर्डर केलेल्या वस्तू हस्तांतरित झाल्यावर या दोन्ही युवकांना रिफंड मिळाला. मात्र परत आलेल्या वस्तू या डुप्लिकेट असल्याने संबंधित ई-कॉमर्स कंपनीचे म्हणणे आहे. याबाबतची माहिती
अलंकार पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर. टी तटकरे यांनी दिली या अज्ञान दोन युवकांनी या वेबसाइटवरून तीन ऍपल iPhones ऑर्डर केलेत आणि ई-कॉमर्स वेबसाइटच्या रिटर्न पॉलिसीचा वापर करून डुप्लिकेट फोन परत केले.या अज्ञात दोन्ही युवकांनी आणखी कोणती उत्पादने चोरी केली आहेत का,याचा तपासही पोलिस करत आहेत.संबंधित ई-कॉमर्स वेबसाइटचीही तपासणी केली जाणार आहे, दोन्ही युवकांविरोधात भारतीय दंड संहिता आणि कलम 66 (सी) (डी) च्या कलम 41 9 अंतर्गत (व्यक्तिमत्त्वाने फसवणुकीसाठी शिक्षा), 420 (फसवणुकीसाठी शिक्षा), 34 (सामान्य हेतू) आणि अलंकार पोलिस ठाण्यात कलम 66 (सी) (डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

4