बांदयात थांबलेल्या डंपरला कारची धडक: महीला जखमी

129
2

 

बांदा,ता.०८: थांबलेल्या डंपरला वॅगनकार चालकाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात महीला गंभीर जखमी झाली तसेच गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हा प्रकार आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बांदा दोडामार्ग रस्त्यावर घडला.रेश्मा परब (रा.म्हापसा ) असे तिचे नाव आहे. तर पती देवांग परब हे सुदैवाने बचावले.
दरम्यान आपला गाडीवरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात घडला असे परब यांच्याकडून सांगण्यात आले.त्यांना अधिक उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.यासाठी स्थानिक नागरीकांनी त्यांना मदत केली.

4