मालवणात निवृत्त एसटी चालकाची आत्महत्या… फोवकांडा पिंपळ येथील घटना…

2

मालवण, ता. ९ : शहरातील फोवकांडा पिंपळ नजीक राहणारे पंकज तुकाराम माणगावकर (वय-६७) यांनी घरानजीकच्या पेरूच्या झाडास गळफास लावून घेत आत्महत्या केली. आज सकाळी ही घटना उघडकीस आली.
पंकज माणगावकर हे सेवानिवृत्त एसटी चालक होते. काल रात्री नेहमीप्रमाणे ते जेवण आटोपून झोपी गेले. आज सकाळी ते घरात दिसून न आल्याने वहिनीने त्यांचा शोध घेतला असता पाठीमागील पेरूच्या झाडास गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यांनी याची माहिती शेजारी उमेश शिरोडकर यांना दिली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक यतीन खोत, संजय भोगवेकर, प्रसाद परुळेकर, अवधूत परुळेकर, विनायक खोत यांच्यासह अन्य स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, सुदेश आचरेकर, राजू वराडकर, दीपक पाटकर, मोहन वराडकर, उमेश नेरुरकर हेही घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक डॉ. बालाजी सवंडकर, सुनील पवार यांनी घटनास्थळी येत माहिती घेतली. मालवण ग्रामीण रुग्णालयात त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.

4

4