राष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सवात हॉटेल कॅलिफोर्निया लघुपटाची बाजी… पॅम्प्लेट द्वितीय तर चुंगी तृतीय क्रमांकाचा मानकरी…

261
2
Google search engine
Google search engine
Google search engine

मालवण, ता. ९ : आराध्य एंटरटेंन्मेट व व्यासंग मुंबई यांच्यावतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवात ’हॉटेल कॅलिफोर्निया ’ या लघुचित्रपटाने प्रथम क्रमांक मिळविला. ’पॅम्प्लेट’ व ‘चुंगी’ या चित्रपटांनी अनुक्रमे द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविला. या लघुचित्रपट महोत्सवात मालवणी लघुचित्रपट ‘मंगल’ हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला.
मालवण नगरपरिषदेच्या मामा वरेरकर नाट्यगृहात आयोजित केलेल्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेचे दिग्दर्शक अजय मयेकर, माजी आमदार परशुराम उपरकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष अविनाश नेरकर, चित्रपट नाट्य दिग्दर्शक राजदत्त तांबे, प्रसाद पांचाळ, निहारिका तांबे, राजू कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रीय लघुचित्रपटाचा निकाल असा- सर्वोत्कृष्ट प्रेक्षक पसंती लघू चित्रपट – प्रॉन्ज, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – किरण कदम (हॉटेल कॅलिफोर्निया), सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक – शमीम खान (विठा), सर्वोत्कृष्ट संगीत – रविराज कोल्हटकर (तरंग), सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत – किरण राजगोपालन (चुंगी), सर्वोत्कृष्ट संकलक – वैभव सोनी (विठा), सर्वोत्कृष्ट कथा लेखक- शेखर बापू रणखांबे (पॅम्पलेट), सर्वोत्कृष्ट पटकथा लेखक- तिलोत्तम पवार आणि अनिकेत कदम (पाय ईन द स्काय), सर्वोत्कृष्ट संवाद लेखक – किरण कदम (चुंगी), सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार – प्रियशंकर घोष (पॅम्पलेट), सर्वोत्कृष्ट बाल कलाकार – शबनम अन्सारी (तरंग), सर्वोत्कृष्ट बाल कलाकार उत्तेजनार्थ प्रथम – प्रमोद रणखांबे (पॅम्पलेट), सर्वोत्कृष्ट बाल कलाकार उत्तेजनार्थ द्वितीय – सार्थक वाटवे (प्रॉन्ज), सर्वोत्कृष्ट अभिनेता – चित्तरंजन गिरी (ब्लॅक लेबल), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – सुलेखा तळवलकर (विठा), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री उत्तेजनार्थ प्रथम – दीपा माळकर (मंगल), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री उत्तेजनार्थ द्वितीय – मयूरी मोहिते (गजरा).
लघुचित्रपट महोत्सवाचे परीक्षण हिंदी चित्रपट दिग्दर्शक अमित राय आणि मराठी अभिनेता, रात्रीस खेळ चाले फेम मंगेश साळवी यांनी केले. या महोत्सवाचे सूत्रसंचालन निहारिका तांबे, राजदत्त तांबे, राजेंद्र कदम यांनी केले. भाई केळुसकर यांनी आभार मानले.

\