वैभववाडीत पावसाची जोरदार बॕटींग

2

वैभववाडी/प्रतिनिधी: तालुक्यात रविवारी दुपारी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली.अनेक भागात गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे उष्णतेने हैराण झालेल्या वैभववाडीकरांना सुखद धक्का दिला आहे.

[embedyt] https://www.youtube.com/watch?v=882PldDIWZw[/embedyt]

तालुक्यात रविवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मान्सूपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तसेच उकाडा काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तर वीज पुरवठा काही काळ खंडित झाला आहे.

14

4