वेंगुर्लेत खासदार विनाकय राऊत यांचे जंगी स्वागत

253
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेंगुर्ला,ता. ९ : लोकसभा निवडणूकीत मिळालेल्या यशाबद्दल पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी वेंगुर्ला दौ-यावर आलेल्या नवनिर्वाचित खासदार विनायक राऊत यांचे आज जनतेने ठिकठिकाणी स्वागत केले. तर वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
सलग दुस-यांदा खासदार झाल्यानंतर विनायक राऊत यांनी जनतेचे  आभार मानण्यासाठी व गाठीभेटी घेण्यासाठी वेंगुर्ला दौरा आयोजित केला होता. या त्यांच्या दौ-यावेळी शहरात लोकप्रतिनिधींसह नागरीकांनी त्यांचे पुष्पहार घालून तसेच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रथम तुळस येथे जाऊन श्री देव जैतिराचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत तुळस मतदारसंघांतील शिवसेना-भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, वेंगुर्ला शहरात प्रवेश करण्यापूर्वी खासदार विनायक राऊत यांनी मठ येथील शिवाजी चौकात भेट दिली. येथे असलेल्या शिवाजी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन त्यांनी अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासमवेत पालकमंत्री दीपक केसरकर, उपसरपंच निलेश नाईक, प्रसाद नाईक,ग्रामपंचायत सदस्य ययाती नाईक आदी उपस्थित होते.
त्यानंतर वेंगुर्ला बॅ. खर्डेकर महाविद्यालयाकडून विजयी मिरवणूक काढण्यात आली. यात शिवसेनेचे भगवे झेंडे लावलेले व भगवे फेटे बांधलेले महिलांसह शिवसेना पदाधिकारी तसेच बहुसंख्य दुचाकीसह सहभागी झाले होते. मार्गात ठिकठिकाणी खासदार राऊत यांचे स्वागत झाले. येथील प्रसिद्ध ‘किरात‘ साप्ताहिकातर्फे सुनिल मराठे व अशोक कोलगांवकर यांनी तर व्यापारी हरेश प्रभूखानोलकर यांनी राऊत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
विजयी मिरवणूक मुख्य बाजारपेठेत येताच नगरपरिषदेतर्फे खासदार विनायक राऊत व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. नगराध्यक्ष दिलीप गिरप, माजी आमदार राजन तेली, भाजपा तालुकाध्यक्ष बाळू देसाई, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, नगरसेवक प्रशांत आपटे, सुहास गवंडळकर, साक्षी पेडणेकर,सुमन निकम, तुषार सापळे, धर्मराज कांबळी, श्रेया मयेकर, भाजपा शहर अध्यक्ष सुषमा खानोलकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. वेंगुर्ला नगरपरिषद कार्यालयीन महिला कर्मचारी यांनी राऊत यांचे औक्षण केले. तर नगराध्यक्ष गिरप यांनी शहरातील विकासात्मक कामांचे निवेदन दिले. पहिल्या टप्प्यात नगरपरिषदेला विकास कामांसाठी १५ लाख देण्याचे जाहीर केले.
या विजयी मिरवणूकीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख विक्रांत सावंत,शिवसेना महिला आघाडी अध्यक्ष जान्हवी सावंत,उपजिल्हाप्रमुख आबा कोंडसकर, अजित नाईक,तालुकाप्रमुख बाळा दळवी, उपतालुकाप्रमुख संजय गावडे, वेंगुर्ला पंचायत समिती सभापती सुनिल मोरजकर, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, माजी नगराध्यक्ष सुनिल डुबळे, संदेश निकम, माजी उपनगराध्यक्ष रमण वायंगणकर, जिल्हा परिषद सदस्य नितीन शिरोडकर, नगरसेवक सुमन निकम,शहरप्रमुख विवेक आरोलकर, वेंगुर्ला दक्षता समितीचे अध्यक्ष सचिन वालावलकर, शिवसेना पदाधिकारी अजित राऊळ, सागर नाणोसकर,युवासेना तालुकाप्रमुख पंकज शिरसाट, महिला आघाडी तालुका संघटक सुकन्या नरसुले, शहर संघटक मंजूषा आरोलकर, महिला शहर उपप्रमुख वृंदा मोर्डेकर, प्रकाश गडेकर, वेतोरे सोसायटी चेअरमन विजय नाईक, पंचायत समिती सदस्य यशवंत परब, अनुश्री कांबळी, आडेली ग्रामपंचायत सदस्य घनश्याम नाईक यांच्यासह शहरातील व तालुक्यातील शिवसेना, युवासेना यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
—————————————–
*हो…आम्ही आता नाश्ता सुद्धा घरपोच देतो✌*
?फक्त एक कॉल करा…
गरमागरम नाश्ता तुमच्या दारात….?
( *फ्री होम डिलिव्हरी*? )

? *जनता कॅफे,सावंतवाडी*?

▪ऑर्डर करा गरमागरम नाश्ता ?
? शिरा,उपमा,पोहा,कांदा भजी,बटाटा भजी,मिर्ची भजी ( *फक्त २० रू*)
? इडली सांबर,मेंदू वडा,साबुदाणा खिचडी,साबुदाणा वडा ( *फक्त ३० रू* )
? भाजी पाव, आंबोळी चटणी/उसळ,घावणे चटणी/उसळ ( *फक्त ४० रू*)
? चिकन पाव *५० रू* l व्हेज सँडविच *२५ रु* | ऑम्लेट सँडविच *३५ रु* | चिकन सँडविच *४० रु*
*——अशा प्रकारचा सर्व नाश्ता उपलब्ध—-*

*?आमचा पत्ता :* जनता कॅफे,आदिनारायण मंगल कार्यालयासमोर,मिलाग्रीस रोड सावंतवाडी

*✌फ्री होम डिलिव्हरी✌*
Call – *7447329082 || 8275573881*
_____________________________
? *YouTube वर Subscribe करा*
https://www.youtube.com/channel/UC26AyagZUjq41hudfGa6E3A

\