जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सक नेमके कोण ?

250
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी, ता.१०: माझी शासन आदेशानुसार येथे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून बदली झाली आहे. शासन आदेशानुसार मी येथे हजर झाली आहे, असे स्पष्ट मत नूतन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुप्रिया देशमुख यांनी सिटीस्कॅन मशीन लोकार्पण सोहळ्याच्या तयारीच्या पाश्वभूमीवर बदली झालेल्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ धनंजय चाकूरकर यांच्याकडून सुरु असलेल्या हालचालीवर कर्मचाऱ्यांशी बोलताना केले. दरम्यान, याबाबत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी ‘नेमके जिल्हा शल्य चिकित्सक कोण ? असा प्रश्न केला असता, आजच्या दिवसभरात हा तिढा आपण सोडविणार असे सांगितले.
महाराष्ट्र शासनाने सिंधुदुर्ग जिल्हा चिकित्सक म्हणून कोल्हापूर जिल्हा रुग्णालयातील डॉ सुप्रिया देशमुख यांची नियुक्ती केली आहे. तर जिल्हा चिकित्सक डॉ धनंजय चाकूरकर यांची त्याच पदावर परभणी येथे बदली केली आहे. बदली करताना शासनाने बदली अधिकाऱ्यांना तात्काळ आपल्या नव्या सेवेच्या जागेवर हजर होण्यास सांगितले आहे. त्यानुसार डॉ सौ देशमुख या सिंधुदुर्ग जिल्हा रुग्नालयात हजर होण्यास शुक्रवारी दाखल झाल्या. मात्र, परभणी येथे बदली झालेले डॉ चाकूरकर आपला पदभार सोडण्यास तयार नाहीत. त्यांना परभणी येथे जायचे नसून सिंधुदुर्गातच राहायचे आहे. त्यामुळे नवीन पदभार घेण्यास आलेल्या डॉ सौ देशमुख अडचणीत आल्या आहेत. सोमवारी सिटीस्कॅन मशीनचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी मान्यवरांचे स्वागत करण्यास डॉ सौ देशमुख उपस्थित होत्या.
परंतु डॉ चाकूरकर यांनी पदभार सोडला नसल्याने त्यांनीच मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक केले. यामुळे डॉ सौ देशमुख यांच्या सारख्या वर्ग १ च्या अधिकारी महिलेला भर कार्यक्रमात अपमानित करण्याचा प्रकार घडला. यानंतर पालकमंत्री केसरकर यांनी त्यांची वैयक्तिक भेट घेत हा तिडा सोडविण्याचे आश्वासन दिले. खा. राऊत यांनी डॉ चाकूरकर यांना रिलीज केले पाहिजे, असे या चर्चेत सांगितले. यामुळे येथील अधिकारी व कर्मचारी सुद्धा अडचणीत आले आहेत. कोणाचे ऐकायचे असा प्रश्न त्यांना पडला आहे. डॉ चाकूरकर पदभार द्यायला तयार नाहीत. डॉ सौ देशमुख म्हणतात, ‘शासनाच्या आदेशाने मी येथे आले आहे’. त्यामुळे हा मोठा पेच निर्माण झाला आहे. गेल्या वर्षभरात डॉ चाकूरकर यांनी कोणतेही भरीव काम केलेले नसताना पालकमंत्री केसरकर त्यांना का पाठीशी घालत आहेत ? असा प्रश्न सर्वसामान्य जनता विचारू लागली आहे.

\