दहावीत तालुक्यात प्रथम आलेल्या तेजस्वीनी मोरे हीचे आ. नितेश राणेंकडून अभिनंदन

2

 

वैभववाडी, ता. १० : वैभववाडी तालुक्यात यंदा दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या तेजस्विनी दिलीप मोरे हीचे आ. नितेश राणे यांनी अभिनंदन केले आहे. अभिनंदन पत्र तेजस्विनी हीला सुफुर्द करण्यात आले. सोनाळी येथील अभिनव विद्यामंदिर या प्रशालेतून तेजस्विनी हीने दहावीत ९५ टक्के गुण संपादित केले आहे. वैभववाडी स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष अरविंद रावराणे, जिल्हा प्रवक्ते भालचंद्र साठे यांनी तेजस्विनी मोरे हीचा शाल, श्रीफळ, पुष्पहार व अभिनंदन पत्र देवून सत्कार केला. यावेळी भुईबावडा सरपंच श्रेया मोरे, महेश बागवे, उज्वल नारकर, उपसरपंच रमेश मोरे, दिलीप मोरे, व स्वाभिमान कार्यकर्ते उपस्थित होते.

4

4