मळेवाड न्हावेली राज्यमार्ग खड्डेमुक्त होणार

2

ग्रामस्थांतून समाधान: हेमंत मराठे यांच्या आंदोलनाला यश

सावंतवाडी ता 10
येथील न्हावेली मळेवाड मार्गावरील पडलेले खड्डे बुजविणे व डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
सावंतवाडी मळगाव निरवडे न्हावेली घोडेमुख मळेवाड मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते.यामुळे अनेक अपघात होऊन कित्येक वाहन चालक जखमी झाले होते.यामुळे या मार्गावरील उखडलेल्या रस्त्यावर डांबरीकरण व खड्डे बुजवावेत अशी मागणी वाहन धारकातून केली होती.मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले.म्हणून सामाजिक कार्यकर्ते हेमंत मराठे यांनी सावंतवाडी न्हावेली मळेवाड मार्गावरील डांबरीकरण व खड्डे बुजविण्या चे काम सुरू करा अन्यथा मळेवाड भटवाडी येथे रस्तावर पडलेल्या खड्ड्यात बसून उपोषण छेडण्याचा इशारा दिला.यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने मराठे यांना काम सुरू करण्याबाबत लेखी आश्वासन दिले.लेखी आश्वासन देऊन काम सुरू न केल्यास कोणतेही निवेदन न देता खड्ड्यात बसून उपोषण छेडेन असा इशाराही मराठे यांनी दिला होता.अखेर सावंतवाडी मळेवाड मार्गावरील खड्डे बुजविणे व डांबरीकरण कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदारा मार्फत काम सुरू केले.यामुळे मराठे यांच्या उपोषणाला यश आल्याने वाहन चालक व पादचाऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. तसेच या मार्गावरील अनावश्यक ठिकाणी असणारे गतिरोधक काढण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आपण करणार असल्याचे हेमंत मराठे यांनी सांगितले.

5

4