गवंडीवाडातील युवती बेपत्ता…

2

शोधासाठी पोलिसांचे पथक तैनात;पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांची माहिती…

मालवण,ता. १० : शहरातील गवंडीवाडा येथील वेलांटीना जॉनी फर्नाडिस (वय- २२) ही युवती शुक्रवारपासून बेपत्ता असल्याची तक्रार तिची आई लुसी फर्नाडिस यांनी पोलिस ठाण्यात दिली आहे.त्यानुसार पोलिसांनी तपासासाठी पथक
नियुक्त केल्याची माहिती पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांनी दिली.
वेलांटिना ही परिक्षेसाठी कोल्हापूर येथे शुक्रवारी गेली होती.मात्र कोल्हापूर येथे गेल्यानंतर तीचा संपर्कच बंद झाल्याने कुटुंबियांनी सर्वत्र तिचा शोध घेतला.मात्र ती सापडली नाही.कुटुंबियांकडेही ती पोचली नसल्याचे स्पष्ट झाले.त्यामुळे तिच्या आईने पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दिली.
वेलांटिना हीच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन कोल्हापूर येथे मिळाले.मात्र गेले दोन दिवस तीचा मोबाईल बंद आहे.तसेच तीचा शोधही होत नसल्याने तीच्या कुटुंबियांकडून पोलिस तपासाची मागणी करण्यात आली.कुटुंबियांनी वेलांटिना बेपता होण्यामागे काहीचा हात असल्याचाही संशय व्यक्त करून संबंधित व्यक्तीची नावे पोलिसांना दिली आहेत.पोलिसांनी वेलांटिना हिच्या शोधार्थ पोलिस पथक तैनात करत शोध घेण्यास सुरवात केली आहे.
मोबाईल लोकेशन आणि इतर माहितीगार यांच्याकडून तीचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले. वेलांटिना हिच्या अंगावर दहा ग्रॅमची सोन्याची चेन आणि एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल आहे. अंगावर कुर्ता टॉप व चुडीदार पायजमा परिधान केला आहे. वेलांटिना हिला जबरदस्तीने कोणीतरी अडवून ठेवल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील पवार हे करत आहेत.
________________________
*प्रवेश…✌ प्रवेश…✌ प्रवेश…✌*

? *जयहिंद कॉलेज ऑफ सायन्स,साळगाव*?
*हॉटेल मॅनेजमेंट* (बॅचलर ऑफ हॉस्पिटॅलिटी स्टडीज)
मुंबई युनिव्हर्सिटी संलग्न व महाराष्ट्र सरकार मान्यताप्राप्त

? *आता हॉटेल मॅनेजमेंट डिग्री माफक दरात*?

*पात्रता:* बारावी (कॉमर्स,एमसीव्हीसी,सायन्स,आर्ट्स )
✴अनुभवी प्राध्यापक
✴दर्जेदार शिक्षण
✴तारांकित हॉटेल्समध्ये प्रशिक्षण
✴मागासवर्गीयांना सरकारी नियमानुसार शिष्यवृत्ती

♦ *आमचा पत्ता :* साळगाव ता. कुडाळ
♦ *नंबर : 7030938095* *7030938096* *9890945878*
_________________________
? *YouTube वर Subscribe करा*
https://www.youtube.com/channel/UC26AyagZUjq41hudfGa6E3A

4